India vs New Zealand T20I : लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळाला, मात्र संघातील खेळाडूंपासून ते माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी स्टेडियमच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली.
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लखनऊच्या एकना स्टेडियमच्या पिच क्युरेटरला हटवण्यात आले आहे. खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे नसल्याने दोन्ही संघांच्या फलंदाजांना त्यावर फलंदाजी करणे खूप कठीण झाले आहे.
सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याला खेळपट्टीबद्दल राग आला. हार्दिक पांड्या म्हणाला होता की, 'या दोन विकेट टी-20 साठी बनवलेल्या नाहीत. कुठेतरी क्युरेटर किंवा ज्या मैदानावर आपण खेळणार आहोत, त्यांनी आधी खेळपट्ट्या तयार केल्या पाहिजेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्युरेटरने या खेळासाठी काळ्या मातीच्या दोन पिच आधीच तयार केल्या होत्या. मात्र सामन्याच्या तीन दिवस आधी संघ व्यवस्थापनाच्या शेवटच्या क्षणी विनंती करून क्युरेटर्सना काळ्या रंगाच्या जागी लाल मातीची नवीन खेळपट्टी लावण्यास सांगण्यात आले. एवढ्या कमी सूचनेवर नवीन खेळपट्टी योग्य प्रकारे तयार होऊ शकली नाही.
रविवारच्या सामन्यानंतर पिच क्युरेशनवर जोरदार टीका झाली जेव्हा टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनीही हार्दिक पांड्याशी सहमती दर्शवली. पारस म्हांबरे म्हणाले, लखनौ येथील खेळपट्टी आव्हानात्मक होती. यामध्ये दुमत नाही. आम्ही न्यूझीलंडला 99 धावांमध्ये रोखले. आम्हाला विजय संपादन करता आला. मात्र प्रतिस्पर्ध्यांनी 120 ते 130 धावा फटकावल्या असत्या तर धावांचा पाठलाग करणे आणखी कठीण गेले असते. खेळपट्टी अशी का होती, याचे उत्तर क्युरेटरच देऊ शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.