न्यूझीलंडच्या एजाजचं शरद पवारांकडून कौतुक, म्हणाले..

शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून एजाजच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
Ajaz Patel And Sharad Pawar
Ajaz Patel And Sharad PawarSakal
Updated on

India vs New Zealand, 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस विक्रमी ठरला. भारतीय वंशाच्या न्यूझीलंड फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) याने दोन दशकापूर्वी क्रिकेटच्या मैदानात झालेल्या विश्व विक्रमाची (World Record) पुनरावृत्ती केली. न्यूझीलंडच्या एजाझ पटेलनं डावात 10 विकेट्स मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवला. या कामगिरीनंतर क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. राष्ट्रवादीचे प्रमुख आणि कधीकाळी बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्षपद भुषवलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील न्यूझीलंडच्या या फिरकीपटूचे कौतुक केले आहे.

Ajaz Patel And Sharad Pawar
IND vs NZ : विराट कोहलीने न्यूझीलंडला का दिला नाही फॉलोऑन?

शरद पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून एजाजच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. कसोटी सामन्यात एका डावात 10 विकेट घेऊन विलक्षण कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन. मुंबईत जन्मलेल्या आणि आता न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूचा आम्हालाही अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात अशी कामगिरी करणारा तू केवळ तिसरा गोलंदाज आहेस, अशा आशयाचे ट्विट करत शरद पवारांनी एजाज पटेलची पाठ थोपटली आहे.

Ajaz Patel And Sharad Pawar
Ajaz Patel : मुंबई टू ऑकलंड एजाज पटेलचा रंजक प्रवास

जन्माने मुंबईकर असलेला न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलनं एका डावात अख्ख्या भारतीय संघाला तंबूत धाडलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. मुंबईत जन्म झालेल्या एजाजने भारताविरुद्धच्या मुंबई कसोटीतील पहिल्या डावात हा पराक्रम केला आहे. एजाज पटेल त्याच्या आई वडिलांसोबत 1996 पासून न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास आहे. एजाजने भारताविरुद्धच्या कसोटीत 47.5 षटके टाकली. यात त्याने 119 धावा खर्च करुन भारताच्या पहिल्या डावात सर्व विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने इंग्लंडच्या जीम लॅकर आणि भारताच्या अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

भारतीय संघाला तंबूत धाडल्यानंतर क्रिकेटप्रेमींकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाने एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. त्यामध्ये भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ड्रेसिंग रुममध्ये उभा राहून टाळ्या वाजवताना दिसत आहे. बीसीसीआय़ने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की, भारताचा डाव संपल्यानंतर एजाजसह न्यूझीलंडचे खेळाडू बाहेर पडत होते. तेव्हा अश्विनसह ड्रेसिंग रुममधील इतर सर्वजण टाळ्या वाजवून एजाजचे अभिनंदन करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.