IND vs NZ: शेवटच्या षटकात हार्दिकने सूर्याला दिला महत्त्वाचा सल्ला; 'तूच आता...'

शंभरी गाठताना भारताची दमछाक...
India vs New Zealand T20I
India vs New Zealand T20I ेोकोत
Updated on

India vs New Zealand T20I : विजयासाठी धावा करायच्या होत्या अवघ्या 100 आणि त्यासाठी सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या असे फलंदाज मैदानात होते, तरीही भारताची दमछाक झाली, अखेर एक चेंडू राखून भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला आणि टी-20 मालिकेत बरोबरी साधली.

भारताने न्यूझीलंडला 20 षटकांत 8 बाद 99 धावांवर रोखले आणि या आव्हानासाठी भारताने चार फलंदाज गमावले. भारताचे चारपैकी दोन फलंदाज धावचीत झाले. अखेरच्या षटकांत भारताला सहा धावांची गरत होती त्यात सूर्यकुमारचा झेल सोडण्यात आला तर हार्दिक धावचीत होता होता वाचला. पण दोन चेंडू असताना सूर्यकुमार यादवने कसाबसा चौकार मारून विजय मिळवून दिला. त्याच्या 31 चेंडूतील खेळीमधील हा एकमेव चौकार होता.

India vs New Zealand T20I
IND vs NZ: फक्त 1 चौकार, स्ट्राईक रेटही 100 पेक्षा कमी अन्...! तरीही सूर्या 'प्लेयर ऑफ द मॅच'

या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सूर्यकुमार यादवने भारतासाठी विजयी शॉट मारला. सूर्यकुमार यादवने चौकार मारून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. यानंतर सूर्यकुमार यादवने हार्दिक पांड्याला मिठी मारली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचवेळी बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

India vs New Zealand T20I
IND vs NZ: ...अन् खूप उशीर झाला; टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार पांड्याचं धक्कादायक विधान!

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात सामनावीर ठरल्यानंतर सूर्यकुमार यादव सामना संपल्यानंतर म्हणाला की, जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा खेळणे आणि परिस्थितीनुसार जुळवून घेणे खूप महत्त्वाचे होते. खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. पण हार्दिक माझ्याकडे आला आणि म्हणाला की पुढच्या चेंडूवर तू विजयी धाव घेणार आहेस आणि त्यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला.

India vs New Zealand T20I
IND vs NZ: 'माझं चुकलं...' टीम इंडियाला विजय मिळवून देणारा सूर्या असं का म्हणाला?

दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 99 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने 2 तर दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी 1-1 विकेट घेतल्या. टीम इंडियाने 1 चेंडू शिल्लक असताना 100 धावांचे लक्ष्य गाठले. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 26 आणि कर्णधार हार्दिक पंड्याने नाबाद 15 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.