India vs New Zealand 3rd T20 Hardik Pandya Playing-11 : न्यूझीलंडविरुद्ध आज होणाऱ्या अखेरच्या निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यात दडपण भारतीय सलामावीरांवर असणार आहे. शुभमन गिलऐवजी पृथ्वी शॉला संधी मिळणार का, याची उत्सुकता असेल.
खेळपट्ट्या कशाही असो गिल आणि ईशान किशन मालिकेत अपयशी ठरलेले आहेत. ईशान यष्टिरक्षक असल्यामुळे त्याचे स्थान कायम राहू शकेल, मात्र पृथ्वी शॉचा समावेश करायचा असेल तर गिलला वगळण्याचा धाडसी निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्याही एकदिवसीय मालिकेत कमालीचा प्रभाव पाडणाऱ्या गिलला रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे ट्वेन्टी-२० मालिकेत प्राधान्य मिळाले, परंतु पहिल्या दोन सामन्यात तो अपयशी ठरला. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याची निवड झालेली आहे त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या विश्रांतीचा विचार होऊ शकतो.
रणजी क्रिकेट सामन्यात एकाच डावात ३७८ धावांची विक्रमी खेळी केल्यामुळे पृथ्वी शॉची न्यूझीलंडविरुद्धच्या या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली, परंतु प्रत्यक्ष खेळण्याची संधी त्याला मिळालेली नाही. उद्याच्या सामन्यानंतर भारत इतक्यात ट्वेन्टी-२० सामना खेळणार नाही त्यामुळे पृथ्वीला संधी मिळणार का याची उत्सुकता असेल.
विराट कोहलीही संघात नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी राहुल त्रिपाठीला संधी देण्यात आलेली आहे, परंतु तोही गिल आणि ईशान यांच्याप्रमाणे संघासाठी योगदान देऊ शकलेला नाही. गिलसाठी संघ व्यवस्थापन ठाम राहिले आणि पृथ्वी शॉसाठी जागा करायचा निर्णय झाला तर त्रिपाठीला वगळून त्याच्याठिकाणी गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकेल.
धावांचा पाऊस अपेक्षित
लखौनोमधील दुसऱ्या सामन्यातील निकृष्ट खेळपट्टीवरून टीका झाल्यावर खेळपट्टी तयार करणाऱ्या क्यूरेटरची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे उद्याच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यासाठी मुबलक धावा होणारी खेळपट्टी असू शकेल. याच मैदानावर दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात दोनशेपेक्षा अधिक धावा झाल्या होत्या.
खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असली तरी फिरकी गोलंदाजांनाही संधी मिळू शकेल. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल पुन्हा एकदा एकत्रित खेळत आहेत. ते न्यूझीलंडसाठी धोकादायक ठरू शकेल. विशेष म्हणजे लखनौच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजवत असताना चहलला केवळ दोनच षटके गोलंदाजी देण्यात आली होती.
संघ यांतून निवडणार
भारत ः हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मास वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.
न्यूझीलंड ः मिशेल सँटनर (कर्णधार), फिन अलेन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅमपन, डेव्हन कॉनवे, डेन क्लेवर, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेंजामिन लिस्टर, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल रिप्पोन, हेन्री शिल्पे, इश सोधी आणि ब्लेअर टिकनर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.