IND vs NZ Playing-11: शुभमन गिल का इशान किशन कोणाचा होणार पत्ता कट? ही आहे भारताची प्लेइंग-11

IND vs NZ Playing-11
IND vs NZ Playing-11
Updated on

India vs New Zealand T20I : गेल्या चार वर्षांतील भारताची न्यूझीलंडसोबतची ही चौथी टी-20 मालिका आहे. भारताने मागील तीन मालिका एकही सामना न गमावता जिंकल्या आहेत. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. पाहुण्या संघाने पहिला सामना जिंकला असून हार्दिक पांड्याच्या संघाने लखनौमध्ये 100 धावांचे लक्ष्य गाठून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी टीम इंडियासमोर न्यूझीलंडकडून सलग चौथी टी-20 मालिका जिंकण्याचे आव्हान असेल.

IND vs NZ Playing-11
Team India: नरेंद्र मोदी स्टेडियमवर सचिनच्या हस्ते विश्वविजेत्या कन्यांचा सत्कार

सर्वांच्या नजरा भारताच्या प्लेइंग-11 वर असतील कारण शुभमन गिल आणि ईशान किशन ही सलामीची जोडी या मालिकेत फ्लॉप ठरली आहे. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉला येथे संधी द्यावी, अशी सर्वांची मागणी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग धावा करत पृथ्वी शॉने टीम इंडियात पुनरागमन केले आहे, परंतु प्लेइंग-11 मध्ये त्याला स्थान मिळवता आलेले नाही.

IND vs NZ Playing-11
Ajinkya Rahane: टीम इंडियातुन कायमचा पत्ता कटा? लिस्टरशायर क्लबमधून खेळणार रहाणे

कर्णधार हार्दिक पांड्या प्लेइंग-11 बदलणार?

कर्णधार हार्दिक पांड्या संघातील प्लेइंग-11 मध्ये बदल करेल आणि खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या इशान किंवा शुभमनला बाहेर बसवेल. हा देखील एक मोठा प्रश्न आहे, कारण मागील सामन्यात टीम इंडियाने या प्लेइंग-11 ने विजय मिळवला होता.

अर्शदीप सिंग हेही टीम इंडियासाठी मोठे आव्हान आहे, कारण गेल्या दोन सामन्यांमध्ये तो आपल्या रंगात दिसला नाही आणि तो चांगलाच महागात पडला आहे. अर्शदीपने या मालिकेतील 2 सामन्यात 3 विकेट घेत 58 धावा केल्या आहेत, यादरम्यान त्याने 9.66 च्या इकॉनॉमीसह धावा लुटल्या आहेत.

IND vs NZ Playing-11
IND vs AUS Test : दाखवायचे दात वेगळे... त्यापेक्षा सराव सामना नको

तिसर्‍या टी-20 मध्ये हे भारताचे प्लेइंग-11 ही शकते : शुभमन गिल, पृथ्वी शॉ / इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, शिवम मावी, अर्शदीप सिंग

भारत-न्यूझीलंड T20 मालिका

  • • पहिला T20: न्यूझीलंड २१ धावांनी जिंकला

  • • दुसरी T20: भारत 7 गडी राखून जिंकला

  • • तिसरा T20: 1 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()