IND vs NZ: 18 महिन्यांनंतर त्रिशतक सलामीवीराची एन्ट्री! न्यूझीलंडविरुद्धची मालिका पणाला

prithvi shaw on selection for-ind vs nz t20 series
prithvi shaw on selection for-ind vs nz t20 seriessakal
Updated on

Prithvi Shaw IND vs NZ T20 Series : भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामन्यात उतरणार आहे. पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने अथक परिश्रमानंतर विजय मिळवला होता. आता शेवटचा सामना जिंकणारा संघ ट्रॉफीवर कब्जा करेल. कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये निश्चितपणे बदल करणार आहेत.

prithvi shaw on selection for-ind vs nz t20 series
Virat Kohli : कोणत्या ऐतिहासिक महिलेसोबत डिनर? विराटनं दिलं 'ह्रदयस्पर्शी' उत्तर

आज भारतीय संघ अहमदाबाद येथे न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिका निर्णायक सामना खेळणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार हार्दिकच्या प्लेइंग इलेव्हनवर असतील. मालिकेतील सलग दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेले इशान किशन आणि शुभमन गिल यांना वगळले जाऊ शकते. प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉला संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला चांगली सलामी मिळवता आली नाही. शुभमन आणि ईशानची जोडी अपयशी ठरली आहे. पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. जुलै 2021 मध्ये त्याने पहिला आणि शेवटचा T20 सामना खेळला. 18 महिन्यांनंतर त्याला पुनरागमनाची संधी मिळू शकते.

prithvi shaw on selection for-ind vs nz t20 series
MS Dhoni : नि:स्वार्थी खेळाडू! गेल, कुंबळे अन् उथप्पा सर्वांनी घेतलं एकच नाव...

देशांतर्गत सामन्यांमध्ये या सलामीवीराने सतत स्फोटक खेळी करत खेळ निवडकर्त्यांना संघात स्थान देण्यास भाग पाडले. नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी हंगामात पृथ्वीने आसामविरुद्ध 379 धावांची अतुलनीय खेळी खेळली होती. याशिवाय बीसीसीआयच्या टी-20 लीग सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने द्विशतक झळकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.