Shubman Gill IND vs NZ 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकात 4 गडी गमावून 234 धावा केल्या. शुभमन गिलने शानदार फलंदाजी करताना टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने हे शतक 54 चेंडूत केले. शुभमनने 63 चेंडूंत 12 चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद 126 धावा केल्या.
शुभमनचे गेल्या 17 दिवसांतील हे चौथे आंतरराष्ट्रीय शतक आहे. याआधी शुभमनने वनडे फॉरमॅटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. या वर्षी 15 जानेवारीला शुभमनने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 116 धावा केल्या होत्या, त्यानंतर 18 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 208 धावा केल्या होत्या. 24 जानेवारीला शुभमनने न्यूझीलंडविरुद्ध 112 धावा केल्या होत्या. आता त्याने टी-20 मध्ये शतक झळकावले आहे. या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केल्यानंतर त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर शुभमन गिल म्हणाला, जेव्हा तुम्ही सराव करता आणि त्याचा फायदे झाल्यावर तुम्हाला खूप आनंद असता. संघासाठी मोठी खेळी खेळल्याचा आनंद होत आहे. षटकार मारण्याचे प्रत्येकाची स्टाईल वेगळे असते. हार्दिक भाईने मी ज्या पद्धतीने फलंदाजी करतो त्या पद्धतीने करायला सांगितली. अतिरिक्त काही करण्याची गरज नाही. फलंदाजी जेव्हा तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करता तेव्हा मला थकवा जाणवत नाही. तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना मला आनंद होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.