India vs New Zealand T20I : भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करून 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलची मुख्य भूमिका बजावली, त्याने नाबाद 126 धावांची खेळी केली. शुभमनला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पण सूर्यकुमार यादवची एक इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दुसऱ्या धडाकेबाज खेळाडूला गेम चेंजर म्हणत आहे.
टी-20 क्रिकेटचा बादशाह सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात शुभमन गिलच्या जागी राहुल त्रिपाठीला गेम चेंजर म्हटले आहे. या सामन्यात गिलने शतक झळकावले असेल, पण सुरुवातीला ईशान किशनची विकेट पडल्यावर त्याचे दडपण राहुल त्रिपाठीने 44 धावांची झटपट खेळी करून दूर केले. राहुलने अवघ्या 22 चेंडूंत 4 चौकार आणि तीन गगनाला भिडल असे षटकार मारले.
सामन्यानंतर सूर्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर राहुल त्रिपाठीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याला गेम चेंजर म्हणून वर्णन केले. त्याची ही इन्स्टा स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शुभमन गिलच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 234 धावांची मजल मारली. गिलने या काळात 126 धावांची नाबाद खेळी खेळली. गिलशिवाय राहुल त्रिपाठीने 22 चेंडूत 44 धावांची तुफानी खेळी केली.
235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 66 धावांत गारद झाला. यादरम्यान हार्दिक पांड्याने 4 तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांना 2-2 यश मिळाले. मर्यादित षटकांच्या मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर, भारताला आता 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.