मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी भारताने 376 धावांनी जिंकत मालिका आपल्या नावावर केली. या सामन्यात भारताने कसोटी क्रिकेटमधला आपला सर्वात मोठा विजय साकारला. असे असले तरी या सामन्यात सर्वात दमदार कामगिरी ही न्यूझीलंडच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाज एजाज पटेलचीच ( Ajaz Patel ) होती. त्याने पहिल्या डावात भारताच्या 10 विकेट घेत विश्वविक्रमाची बरोबरी केली. विशेष म्हणजे भारतीय फलंदाज हे फिरकीचा सामना करण्यात माहीर असतात. एजाजने त्याच संघाविरुद्ध एका डावात 10 विकेट घेण्याची किमया केली. एजाजने दुसऱ्या डावातही 4 विकेट घेतल्या.
मात्र एजाज पटेल ( Ajaz Patel ) सामन्यात 14 विकेट घेऊनही कमनशिबी ठरला. एजाजने जरी पहिल्या डावात 10 विकेट घेतल्या तरी त्याचा संघ काही सामना जिंकू शकला नाही. एजाजने 119 धावा देत 10 विकेट घेतल्या मात्र सामना भारताने जिंकला. अशीच घटना 1993 मध्ये घडली होती. त्यावेळी कपिल देव ( kapil dev ) यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध 83 धावा देत 9 विकेट घेतल्या होत्या. मात्र भारत सामना जिंकू शकला नव्हता. आता कपिल देव यांची जागा एजाज पटेलने ( Ajaz Patel ) घेतली आहे. अशीच घटना 1999 मध्येही घडली होती. जवागल श्रीनाथ ( Javagal Srinath ) यांनी सामन्यात 9 विकेट घेतल्या होत्या मात्र भारत सामना जिंकू शकला नव्हता.
दुसरी गोष्ट म्हणजे वानखेडे स्टेडियममध्ये एकाच नावाचा हल्ला होता तो म्हणजे एजाज पटेल. मात्र सामन्यात 14 विकेट घेऊनही त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला नाही. सहसा सामन्यात इतक्या विकटे घेणाऱ्या गोलंदाजालाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतो. मात्र वानखेडे कसोटीचा मानकरी म्हणून मयांक अग्रवालची ( Mayank Agarwal ) निवड करण्यात आली. एजाज पटेलने इतकी जबरदस्त कामगिरी करुनही त्याच्या संघाला विजय मिळवता आला नाही. उलट त्यांचा कसोटीमधील आतापर्यंतच सर्वात मोठा पराभव झाला.
त्यामुळे सामन्यात 14 विकेट घेणारा एजाज पटेल ( Ajaz Patel ) संघाच्या ड्रेसिंगरुमधील पराभवाचे वातावरणही बदलू शकला नाही. तसेच वैयक्तिकरित्या मॅन ऑफ द मॅच म्हणूनही त्याचा गौरव झाला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.