IND vs NZ: 'ट्वेंटी-२०मुळे बचावात्मक खेळाचे तंत्र कमी झालेय' मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केलं स्पष्ट मत

IND vs NZ 3rd: वानखेडे मैदानावर न्यूझीलंडविरूद्धच्या अंतिम कसोटी सामन्याला सुरूवात झाली असून WTC फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे गरजेचे आहे.
Gautam gambhir
Gautam gambhiresakal
Updated on

IND vs NZ Gautam Gambhir PC: कसोटी क्रिकेटमध्ये जे खेळाडू यशस्वी झालेत त्या सर्वांचाच बचाव उत्तम होता. आता मात्र ट्वेंटी-२० प्रकारामुळे बचाव करण्याची मानसिकता कमी झालेय. शेवटी कसोटी क्रिकेट हे सर्वोत्तम आहे. आम्हालाही बचाव भक्कम करावा लागेल, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले.

मायदेशात प्रामुख्याने फिरकीसमोर उत्तम बचाव करणारा संघ म्हणून भारताची ओळख होती; परंतु न्यूझीलंडच्या फिरकीसमोर रोहित, विराटसह सर्वांचा बचावात्मक खेळ उघडा पडला होता. या पार्श्वभूमीवर गंभीर यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे ठरले.

ट्वेंटी-२० चे सामने पाटा खेळपट्टीवर खेळले जातात, तेथे बचावात्मक खेळाची परीक्षा होत नाही. आम्हाला आमचा खेळ अधिक चोख करावा लागणार आहे. भविष्यात भक्कम बचावात्मक खेळाचा अभाव जवळपास सर्वच संघांमध्ये पाहायला मिळू शकतो, असे गंभीर म्हणाले.

Gautam gambhir
IND vs NZ 3rd Test: वानखेडेच्या कसोटीत २४ वर्षांनी जुळून आला योगायोग; मुंबईकर खेळाडूंमुळे झालं शक्य

कसोटी सामन्यांत वेगळ्या प्रकारचा (अधिक आक्रमक) खेळ करा, असा सल्ला देण्याची आवश्यकता नाही. कारण कसोटी हे त्याचप्रमाणे खेळले गेले पाहिजे. एका दिवसात ४०० धावा करण्याची आणि आवश्यकता निर्माण झाली तर दोन दिवस फलंदाजी करण्याचीही क्षमता संघात असायला हवी, हाच खरा कसोटी क्रिकेटचा आत्मा आहे. परिस्थितीनुसार खेळात बदल करणे गरजेचे असल्याचे गंभीर यांनी सांगितले.

कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक सत्राचा विचार करणे महत्त्वाचे आहे. आमच्या संघात असलेल्या फलंदाजांचा विचार करता किमान चार ते पाच सत्र फलंदाजी गरजेचे आहे, त्यामुळे पुरेशा धावा फटकावल्या जाऊ शकतात. कसोटीत सकाळी साडेनऊ वाजता आणि पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात वेगवेगळ्या विचाराने आणि तंत्राने फलंदाजी करावी लागत असते, असेही मत गंभीर यांनी मांडले.

न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका गमावली असली तरी उद्यापासून सुरू होणारा हा सामना आमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण ऑस्ट्रेलियात जाण्यापूर्वी अखेरच्या सामन्यात विजय मिळवलेला असेल तर आत्मविश्वास उंचावण्यात तेवढीच मदत होत असते. असे गंभीर म्हणाले.

Gautam gambhir
IND vs NZ: जसप्रीत बुमराहला मुंबई कसोटीतून का बाहेर केलं? BCCI ने सांगितलं खरं कारण

स्वभाव बदलावा लागतो

गौतम गंभीर खेळाडू असताना धीरगंभीर असायचे. आयपीएलमध्ये प्रशिक्षक असतानाही त्यांचा स्वभाव कायम होता; परंतु आता भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यानंतर त्यांच्या स्वभाव बदलल्याचे दिसून येत आहे. प्रशिक्षक झाल्यावर स्वभावात थोडा बदल करावा लागतो, खेळाडूंना मोकळीक द्यावी लागते; पण कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर त्याच खेळाडूंच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना समजावेही लागत असते, असे गंभीर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.