IND vs NZ: एकही सामना न खेळता पृथ्वीने उचलली ट्रॉफी! किशन-शुभमन कोपर्‍यात

अखेर पृथ्वी शॉने शुभमनची जागा घेतली मात्र फक्त काही मिनिटांसाठी
 Ind vs nz Hardik Pandya Hands Trophy To Prithvi Shaw After India Beat NZ Ishan Kishan-Shubman Gill corner
Ind vs nz Hardik Pandya Hands Trophy To Prithvi Shaw After India Beat NZ Ishan Kishan-Shubman Gill corner
Updated on

Ind vs NZ Prithvi Shaw : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अहमदाबादची लढत जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली. यासोबतच भारताचा टी-20 हंगामही संपुष्टात आला आहे. टीम इंडियाला पुढील पाच महिने या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळायचा नाही.

50 षटकांचा वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या वर्षात बीसीसीआय टी-20 ला फारसे महत्त्व देत नाहीये. या सामन्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार हार्दिक पांड्या पृथ्वी शॉला मालिकेची ट्रॉफी देताना दिसत आहे. किशन-शुभमन कोपर्‍यात आहेत.

 Ind vs nz Hardik Pandya Hands Trophy To Prithvi Shaw After India Beat NZ Ishan Kishan-Shubman Gill corner
IND vs NZ: शतकाच सिक्रेट! "हार्दिक भाईने सांगितले बॅटिंग कशी करायची..."

हार्दिक पांड्या आपल्या आवडत्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये वारंवार संधी देत ​​राहिला. ईशान किशनला टी-20 मध्ये खूप संधी मिळाल्या. तो एकदाही स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. हार्दिकने इशानबाबत हट्टी वृत्ती स्वीकारली. आधी श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि आता न्यूझीलंडविरुद्धचे तितकेच सामने, या डावखुऱ्या फलंदाजाला संधी मिळत राहिली. त्याला संधी देण्यासाठी पृथ्वी शॉ या मालिकेत फक्त बेंचवर बसलेला दिसला.

 Ind vs nz Hardik Pandya Hands Trophy To Prithvi Shaw After India Beat NZ Ishan Kishan-Shubman Gill corner
IND vs NZ: 'मालिकावीराचा पुरस्कार माझा नाही', विक्रमी विजयानंतर कॅप्टन पांड्या हे काय म्हणाला

रणजी ट्रॉफीमध्ये बॅक टू बॅक इनिंग खेळल्यानंतर पृथ्वी शॉने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे. अलीकडेच त्याने देशांतर्गत क्रिकेट सामन्यात त्रिशतकही ठोकले. त्यानंतर निवड समितीने त्याला संधी देणे भाग पडले.

हार्दिक पांड्याने संपूर्ण टी-20 मालिकेत पृथ्वी शॉला संधी दिली नसली तरी विजयानंतर त्याने खिलाडूवृत्ती दाखवली. अहमदाबादमध्ये विजयाची ट्रॉफी स्वीकारल्यानंतर तो प्रथम पृथ्वी शॉकडे गेला आणि त्याच्याकडे ट्रॉफी सुपूर्द केली. यानंतर संपूर्ण टीमने मिळून ट्रॉफीसोबत फोटो काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.