NZ vs IND : Amazon Primeसाठी खर्च करण्याची नाही गरज, भारत-न्यूझीलंड सामना येथे पहा 'फ्री'

तुम्ही भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना फ्री कुठे पाहू शकता? जाणून घ्या एका क्लिकवर
IND NZ Live Broadcast on DD Sports
IND NZ Live Broadcast on DD Sportssakal
Updated on

IND vs NZ Live Broadcast on DD Sports : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. वेलिंग्टनमध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ उपांत्य फेरीत बाहेर पडले होते. भारताला इंग्लंडविरुद्ध आणि न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडिया आणि किवी टीम तो पराभव विसरून नव्याने सुरुवात करणार आहेत.

IND NZ Live Broadcast on DD Sports
FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाच्या विजयात लिओनेल मेस्सी चमकला

भारताचा नियमित रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल या मालिकेत खेळत नाहीत. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. पांड्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सची कमान हाती घेतली आहे. त्याने पहिल्याच सत्रात संघाला चॅम्पियन बनवले होते. त्यानंतर त्याला भारताचे कर्णधारपदाची संधी मिळाली. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंडकडून दोन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 ने जिंकली. हार्दिक प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या संघाविरुद्ध कर्णधारपद भूषवणार आहे.

IND NZ Live Broadcast on DD Sports
india vs new zealand : आता तयारी पुढच्या टी-२० वर्ल्डकपची

भारत आणि न्यूझीलंड या मालिकेतील डिजिटल अधिकार अॅमेझॉन प्राइमकडे आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला पैसे भरून सामना पाहावा लागेल. मात्र चाहत्यांसाठी आनंदाची एक बातमी म्हणजे सामना फ्री सुद्धा पाहता येणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सने विकत घेतले आहेत. सर्व सामने डीडी स्पोर्ट्सवर प्रसारित केले जाणार आहेत. म्हणजेच आता या मालिकेतील सर्व सामने फ्री मध्ये डीडी स्पोर्ट्सवर पाहु शकता.

IND NZ Live Broadcast on DD Sports
FIFA World Cup 2022 Qatar : चर्चा तर होणारच! कतारमधील आचारसहिंतेत पुरूषांच्या शॉर्टवरही आली बंदी
  • भारतीय संघ : ईशान किशन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर/संजू सॅमसन/दीपक हूडा, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल/उमरान मलिक, भुवनेश्‍वरकुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

  • न्यूझीलंड संघ : फिन ॲलेन, डेव्होन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलीप्स, डॅरेल मिचेल, जेम्स निशाम, मिचेल सँटनर, टीम साऊथी, इश सोधी, ॲडम मिल्न, लॉकी फर्ग्युसन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.