IND vs NZ: द्विशतकानंतर किशन ड्रॉप; किशनने रोहितचा डाव त्याच्यावरच उलटवला

200 धावा करूनही तू 3 सामने खेळला नाहीस?
rohit sharma  ask ishan kishan
rohit sharma ask ishan kishan
Updated on

Rohit Sharma ask Ishan Kishan : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिलची मुलाखत घेतली. यावेळी त्याच्यासोबत इशान किशनही होता.

rohit sharma  ask ishan kishan
MI च्या फिल्डरने LIVE मॅचमध्ये पाकिस्तानी महिला अँकरला पडलं खाली; VIDEO होतोय व्हायरल

मुलाखतीत बोलताना रोहित शर्मा शुभमन गिलला बोलला की, मी आणि इशान किशन 200 क्लबमध्ये तुझे स्वागत करतो. रोहितने शुभमनच्या 208 धावांच्या खेळीबद्दल सांगितले. यादरम्यान रोहित शर्माने अचानक इशान किशनला विचारले की, 200 धावा करूनही तू 3 सामने खेळला नाहीस? यावर ईशान किशन म्हणाला, 'भाऊ, हे फक्त तूच सांगशील, तू कॅप्टन होतास. हे ऐकून रोहित आणि शुभमन गिल हसले.

rohit sharma  ask ishan kishan
Shubman Gill : गिलच्या द्विशतकाचे ज्युनिअर NTR सोबत मोठं कनेक्शन; पोस्टमधून खुलासा

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी या डावखुऱ्या फलंदाजाचा संघात समावेश करण्यात आला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना वगळल्याने रोहित शर्मावर टीका झाली होती.

rohit sharma  ask ishan kishan
IND vs NZ: गिलचं द्विशतक अन् गब्बरचं ट्वीट व्हायरल! वाचा नक्की काय म्हणाला...

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित षटकात आठ गडी गमावून 349 धावा केल्या. शुभमन गिलने 149 चेंडूत 208 धावांची संस्मरणीय खेळी खेळली. शुभमन गिलने लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर लागोपाठ तीन षटकार ठोकून दुहेरी शतक पूर्ण केले. गिलशिवाय कर्णधार रोहित शर्माने 34 आणि सूर्यकुमार यादवने 31 धावा केल्या. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात किवी संघ 337 धावांत गारद झाला आणि भारताने 12 धावांनी सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.