IND vs NZ: टाटा बाय बाय गब्बर! 'या' दिग्गज खेळाडूने बळकवले धवनचे स्थान

गब्बर गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे आता...
shikhar dhawan
shikhar dhawansakal
Updated on

Shikhar Dhawan Team India : भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवन गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. आधीच भारताच्या टी-20 आणि कसोटी संघातून बाहेर पडला. मात्र आता त्याला वनडे संघातून वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत तो 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर त्याच्या जागी युवा सलामीवीरांना संघात स्थान मिळाले आहे.

shikhar dhawan
Murali Vijay on BCCI: 'आम्ही 80 वर्षांचे म्हातारे', BCCI वर भडकून मुरलीने घेतला मोठा निर्णय?

शिखर धवनला श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही मालिकांमधून निवड समितीने वगळले आहे. तर सहा महिन्यांपूर्वी त्याने संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. याआधी बांगलादेश दौऱ्यावर तो आपल्या लयीत दिसला नाही. त्याने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 3,8,7 धावा केल्या आहेत. गेल्या पाच डावांत त्याला केवळ 49 धावा करता आल्या आहेत.

shikhar dhawan
Maharashtra Kesari: कुस्तीचे 'जग' जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा 'सिंकदर'

शिखर धवनऐवजी निवड समितीने इशान किशन आणि शुभमन गिलसारख्या युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे. हे दोन्ही खेळाडू गेल्या काही काळापासून चमकदार कामगिरी करत आहेत. शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 70 धावांची तुफानी खेळी केली. त्याच वेळी गेल्या वर्षी 2022 एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. त्याने आतापर्यंत भारतासाठी 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 757 धावा केल्या आहेत.

shikhar dhawan
IND vs AUS: मुंबईच्या खेळाडूवर किती दिवस अन्याय? कसोटीत 4931 धावा तरी दिली नाही संधी

दुसरीकडे, इशान किशनने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले. त्याने 210 धावांची इनिंग खेळली होती. त्याने भारतासाठी 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 477 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत शिखर धवनसाठी टीम इंडियात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे.

शिखर धवन टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने भारतासाठी 34 कसोटी सामन्यांमध्ये 2315 धावा, 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6793 धावा आणि 68 टी-20 सामन्यात 1759 धावा केल्या आहेत. त्याने रोहित शर्मासोबत ओपनिंग करून टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()