IND vs NZ:''आमच्या खेळाडूंना धक्का बसला'' रांची व लखनौतील खेळपट्टीवर पांड्याची टीका

India vs New Zealand T20I
India vs New Zealand T20Isakal
Updated on

India vs New Zealand T20I: भारत-न्यूझीलंड यांच्यामधील पहिल्या दोन लढतींसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांवर टीका करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या याने दोन्ही खेळपट्ट्यांना टार्गेट करताना रांची व लखनौ येथे झालेल्या पहिल्या दोन लढतींच्या खेळपट्ट्या टी-२० क्रिकेटसाठी पोषक नव्हत्या, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

India vs New Zealand T20I
Marnus Labuschagle : मार्नस लाबुशने भारत दौऱ्यावर किटबॅग भरून कॉफी का घेऊन येतोय?

खेळपट्टी आव्हानात्मक असल्याची भीती नाही. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पण पहिल्या दोन लढतींदरम्यान वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्या वाईट होत्या. आमच्या संघातील खेळाडूंना अशा प्रकारची खेळपट्टी पाहून धक्का बसला. टी-२० क्रिकेटसाठी या दोन्ही खेळपट्ट्या बनवल्या नव्हत्या, असेही हार्दिक पुढे म्हणाला. मैदानाची देखरेख करणारे किंवा क्युरेटर यांनी लढत सुरू होण्याआधी खेळपट्टी तयार करायला हवी. माझे एवढेच म्हणणे आहे. कारण त्यानंतरच चांगला खेळ होऊ शकतो, असे ही त्याने स्पष्ट केले.

India vs New Zealand T20I
Indian Men's Hockey Team : वर्ल्डकप पराभवानंतर हॉकी इंडियात मोठी खळबळ; प्रशिक्षकांनी दिला राजीनामा

षटकाराविना लढतीचा विक्रम

भारत-न्यूझीलंड यांच्यामधील लखनौ येथील टी-20 लढतीत दोन्ही संघांनी मिळून 14 चौकार मारले; पण या लढतीत एकही षटकार मारला गेला नाही. टी-20 मधील हाही एक विक्रमच ठरला. एकही षटकार लगावला गेला नसणारी भारतातील ही पहिलीच लढत ठरली. या लढतीत 239 चेंडू टाकले गेले. पण त्यानंतरही एकही षटकार मारला गेला नाही. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकल्या गेलेल्या लढतीत एकही षटकार न लगावलेली ही पहिल्या क्रमांकाची लढत ठरली.

India vs New Zealand T20I
IND vs WI: दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू! वेस्ट इंडिजला चारली पराभवाची धूळ

उत्तराची अपेक्षा क्युरेटरकडून ः पारस

दुसऱ्या टी-20 लढतीसाठीच्या खेळपट्टीवर टीका होऊ लागली. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, लखनौ येथील खेळपट्टी आव्हानात्मक होती. यामध्ये दुमत नाही. आम्ही न्यूझीलंडला 99 धावांमध्ये रोखले. आम्हाला विजय संपादन करता आला. मात्र प्रतिस्पर्ध्यांनी 120 ते 130 धावा फटकावल्या असत्या तर धावांचा पाठलाग करणे आणखी कठीण गेले असते. खेळपट्टी अशी का होती, याचे उत्तर क्युरेटरच देऊ शकतील, असे ही पारस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.