India vs New Zealand, 2nd Test : घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड मिळवलीये. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने अवघ्या 140 धावांत अर्धा संघ गमावला आहे. न्यूझीलंडला उर्वरित दोन दिवसांत अजून 400 धावा करायच्या आहेत. दुसरीकडे भारतीय संघाला या दोन दिवसांत केवळ 5 विकेट मिळवायच्या आहेत.
पहिल्या डावात फ्लॉप शो दाखवणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही तेच गाणं वाजवलं. डॅरेल मिशेलच्या अर्धशतकाशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. त्याने 92 चेंडूत 60 धावा केल्या. ठराविक अंतराने विकेट पडत असताना संयमाने खेळ दाखवण्याची गरज असताना न्यूझीलंड यष्टीरक्षक टॉम ब्लंडेल आणि हेन्री निकोलस यांच्यातील ताळमेळ ढासळल्याचे पाहायला मिळाले. परिणामी 6 चेंडूचा सामना करणाऱ्या टॉमला खातेही न उघडता तंबूचा रस्ता धरावा लागला. विशेष म्हणजे भारताच्या दोन यष्टीरक्षकांनी न्यूझीलंडच्या यष्टीरक्षकाला तंबूचा रस्ता दाखवला. 'टॉम डिक आणि हॅरी' असा तीन यष्टीरक्षकांच्यामध्ये रंगलेल्या खेळात भारतीय यष्टीरक्षक वृद्धीमान साहा आणि श्रीकर भरत यांनी बाजी मारली
मेैदानात भारताचे दोन यष्टीरक्षक कसे?
भारतीय संघाचा दुसरा डाव आटोपल्यानंतर न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. मयांक अग्रवाल आणि शुबमन गिल फिल्डिंगला उतरले नाहीत. या दोघांच्या जागी सुर्यकुमार यादव आणि श्रीकर भारत क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील 37 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर टॉमने श्रीकरच्या दिशेने चेंडू मारुन चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या कसोटी सामन्यात साहाच्या जागी उत्तमरित्या यष्टीमागची जबाबदारी पार करणाऱ्या श्रीकरने मिळेल त्या जागेवर उत्तम फिल्डिंग करु शकतो, असे दाखवून देत न्यूझीलंडला पाचवा धक्का देण्यात मोलाची कामगिरी बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.