World Cup 2023 : 'पाजी ऐसा मजाक कभी न करना', सेमीफायनल आधी का रडला होता विराट कोहली?

ind vs nz world cup 2023 semi final yuvraj singh got cancer and Virat Kohli Cry Before Semi-Final 2011 WC
ind vs nz world cup 2023 semi final yuvraj singh got cancer and Virat Kohli Cry Before Semi-Final 2011 WCsakal
Updated on

Ind vs Nz Semi Final World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी फक्त काही तास बाकी आहे. हा सामना रोहित शर्माच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने साखळी टप्प्यातील सर्व सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाला उपांत्य फेरीचा सामना कोणत्याही परिस्थितीत हरवायचा नाही. पण हा किस्सा आहे, 2011च्या वर्ल्ड कपमध्ये जेव्हा विराट कोहली रडला होता.

ind vs nz world cup 2023 semi final yuvraj singh got cancer and Virat Kohli Cry Before Semi-Final 2011 WC
Pakistan WC 23 : वर्ल्ड कपमधील फ्लॉप शोनंतर पाकिस्तान क्रिकेटची मोठी कारवाई, परदेशी कोचची हकालपट्टी?

त्या वर्ल्ड कपचा हिरो युवराज सिंगला अचानक खोकल्याची उबळ यायला लागली. काही केल्या खोकला थांबत नव्हता. संघातील सपोर्ट स्टाफला वाटले की काहीतरी गडबड आहे. माध्यमांना टाळत रात्री युवराज सिंगला हॉस्पिटलमधे नेले. मोठे डॉक्टर तपासणीअंती म्हणाले, की खोकला शरीरात घुसला आहे... व्हायरल इन्फेक्शन असायची शक्यता आहे.

युवराज तशाच अवस्थेत स्पर्धेतील सामने खेळत होता. नुसता खेळत नव्हता, तर आपल्या अष्टपैलू खेळाने मैदान दणाणून सोडत होता. एकीकडे चांगल्या खेळाचा आनंद होता, तर दुसरीकडे खोकला चिंता वाढवत होता. पुढच्या तपासणीत डॉक्टरांनी कॅन्सरची शक्यता वर्तविली. युवराज नखशिखान्त हादरला.

त्याने संघातील काही मोजक्या साथीदारांना ही बातमी सांगितली होती. त्यापैकी एक होता विराट कोहली. "पाजी ऐसा मजाक कभी न करना" असे म्हणत विराट रडत निघून गेला होता. पण, या वेदना ना युवराजने दाखविल्या नाही विराटने. त्यानंतर युवराजची बॅट आणि बॉल दोन्ही शेवटपर्यंत बोलत होते. आणि 2 एप्रिलला भारतीय क्रिकेट संघाने 28 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.