Ind vs NZ World Cup Playing 11 : टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 चे पहिले चार सामने जिंकले आहेत. आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ पाचव्या सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर खेळत नसल्याचे रोहितने टॉसदरम्यान सांगितले. त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने एकही बदल केलेला नाही.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान पायाने चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात हार्दिक पांड्या दूखापत झाली होती. पांड्याची फलंदाजीतील कमतरता कोण भरून काढण्यासाठी रोहित शर्माने त्याच्या जागी सूर्यकुमार यादवचा समावेश केला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीचा पर्याय वाढवण्यासाठी संघ व्यवस्थापनाने शार्दुल ठाकूरला वगळून मोहम्मद शमीला संधी दिली आहे.
धरमशाला मध्ये भारताचा वनडे रेकॉर्डही फिफ्टी-फिफ्टी आहे. टीम इंडियाने येथे 4 एकदिवसीय सामने खेळले असून 2 जिंकले आणि 2 हारले आहेत. गेल्या वेळी जेव्हा भारताचा येथे न्यूझीलंडचा सामना झाला होता तेव्हा भारताने विजय मिळवला होता.
भारताची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.