IND vs PAK : हार्दिक - भुवनेश्वरच्या शॉर्ट बॉलवर पाकिस्तानची उडाली भंबेरी

IND vs PAK Asia Cup 2022 Hardik Pandya Bhuvneshwar Kumar Short Ball Strategy Worked Pakistan Bating Collapse
IND vs PAK Asia Cup 2022 Hardik Pandya Bhuvneshwar Kumar Short Ball Strategy Worked Pakistan Bating Collapse esakal
Updated on

IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले हात खोलण्याची संधी दिली नाही. विशेष करून हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारने आजच्या सामन्यात शॉर्ट बॉल स्ट्रॅटजी योग्य प्रकारे वापरली. (Hardik Pandya Bhuvneshwar Kumar Short Ball Strategy Worked Pakistan Bating Collapse)

IND vs PAK Asia Cup 2022 Hardik Pandya Bhuvneshwar Kumar Short Ball Strategy Worked Pakistan Bating Collapse
Ind vs Pak: बाबर आझम बाद झाल्यानंतर झाला ट्रोल, लोकांनी कोहलीच्या ट्विटची करून दिली आठवण

पहिल्याच षटकात पाकिस्तान आणि भारत यांनी रिव्ह्यू घेतल्याने भुवनेश्वरचे षटक चांगलेच हॅपनिंगवाले राहिले. मात्र पाकिस्तानचा रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि मोहम्मद रिझवान दुसऱ्याच चेंडूवर बचावला. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शॉर्ट बॉलने सप्राईज केले. बावचळवलेल्या बाबरला चेंडू कळालाच नाही आणि तो अर्शदीप सिंगकडे झेल देऊन 10 धावांवर परतला.

बाबर आझम बाद झाल्यानंतर सलामीवीर मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने मधल्या फळीतील फलंदाजांबरोबर भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र ही भागीदारी तोडण्यात हार्दिकला यश आले. हार्दिक पांड्याने रिझवान आणि इफ्तिकार यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठीची 45 धावांची भागीदारी संपवली. त्याने इफ्तिकारला बाऊन्सरवर बाद केले. इफ्तिकार अहमदने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिकने मोहम्मद रिझवानला 43 धावांवर बाद करत पाकिस्तानचा सेट झालेला फलंदाज बाद केला.

IND vs PAK Asia Cup 2022 Hardik Pandya Bhuvneshwar Kumar Short Ball Strategy Worked Pakistan Bating Collapse
IND vs PAK : भारताच्या NIT श्रीनगरमध्ये भारत-पाकिस्तान सामना समुहाने पाहण्यास बंदी

हार्दिक पांड्याने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात शॉर्ट बॉलचा चांगला मारा करत पाकिस्तानची मधली फळी कापून काढली. त्याने खुशदील शाहला 2 धावांवर बाद केले. हार्दिक पांड्याने आपल्या स्पेलमध्ये सातत्याने 140 किलोमिटर प्रतीतास वेगाने गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याने 25 धावात 3 तर भुवनेश्वर कुमारने 26 धावात 4 बळी टिपले. तर या दोघांना अर्शदीपने 2 तर आवेश खानने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.