Asia Cup 2023 Pakistan Announce Playing 11 Against India : आशिया कप 2023 च्या सुपर 4 मध्ये रविवारी पाकिस्तानचा संघ टीम इंडियाशी भिडणार आहे. या स्पर्धेत हे दोन संघ एकमेकांशी भिडण्याची ही दुसरी वेळ असेल.
पावसामुळे पहिल्या सामन्याचा निकाल लागला नाही. आता कोलंबोमध्ये होणाऱ्या सुपर 4 च्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच PCB ने 11 प्लेइंग ची घोषणा केली आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताविरुद्ध खेळलेला स्टार खेळाडू बाहेर गेला आहे.
भारताविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखाली उपकर्णधार शादाब खान, सलामीवीर फखर जमान आणि इमाम उल हक यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पाकिस्तानच्या मधल्या फळीत मोहम्मद रिझवानसह आगा सलमान आणि इफ्तिखार अहमदसारखे अनेक तगडे फलंदाज आहेत. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्याप्रमाणे यावेळीही अष्टपैलू मोहम्मद नवाजला पाकिस्तानच्या प्लेइंग-11 मध्ये संधी मिळालेली नाही.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सुपर 4 सामन्यासाठी फहीम असराफचा पाकिस्तानी संघात समावेश करण्यात आला होता. हा वेगवान गोलंदाज आता भारताविरुद्धही खेळताना दिसणार आहे. याशिवाय पाकिस्तानी संघातील वेगवान गोलंदाज नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ हे पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहेत. म्हणजे गेल्या वेळी भारताविरुद्ध मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघातून यावेळी एकच बदल पाहायला मिळणार आहे.
भारताविरुद्ध सुपर-4 साठी पाकिस्तानची प्लेइंग 11:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (डब्ल्यूके), फहीम असराफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.