IND vs PAK Football : मी पुन्हा करणार... राड्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांचे ट्विट व्हायरल

IND vs PAK Football Controversy
IND vs PAK Football Controversy esakal
Updated on

IND vs PAK Football Controversy : बंगळुरू येथे भारताने SAFF Championship च्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 - 0 असा पराभव केला. भारताने पहिल्या हाफमध्ये दोन तर दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल करत पाकिस्तानवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. कर्णधार सुनिल छेत्रीने हॅट्ट्रिक केली. मात्र या सामन्याला वादाचे गालबोट लागलेच. भारताचे प्रशिक्षक स्टिमॅक आणि पाकिस्तानचे खेळाडू यांच्यात वाद झाला.

IND vs PAK Football Controversy
Ashes Series Ollie Robinson : ICC चा अजब न्याय; शिव्या देणारा रॉबिन्सन मोकाट अन् औषध लावणारा मोईन गुन्हेगार?

सामन्याचा पहिला हाफ संपत असतानाच रेफ्री प्राजवाल यांनी दिलेला निर्णय कोच इगोर स्टॅमिक यांना पसंत पडला नाही. रेफ्रीने प्रितम कोटालने फाऊल केल्याचे सांगत पाकिस्तानच्या खेळाडूला बॉल थ्रो करण्यास सांगितले होते. यावेळी स्टॅमिक पाकिस्तानी खेळाडू अब्दुल्ला इक्बालच्या जवळच होते. त्यांनी त्याला बॉल थ्रो करण्यापासून रोखले.

या घटनेनंतर पाकिस्तानचे खेळाडू आणि काही कोचिंग स्टाफ देखील प्रशिक्षक स्टॅमिक यांच्या अंगावर धावून आले. त्यावेळी रेफ्री आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केले. भारताच्या विजयापेक्षा या राड्याचीच चर्चा जास्त झाली. रेफ्रींनीही कोच इगोर स्टॅमिक यांना रेड कार्ड दाखवले.

IND vs PAK Football Controversy
Shane Warne Death : डॉक्टरांचा दावा; शेन वॉर्नचा मृत्यू कोरोना लसीमुळे?

आता याबाबत प्रशिक्षक स्टॅमिक यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. ते ट्विटमध्ये म्हणाले की, 'फुटबॉल हा जोशपूर्ण खेळ आहे. ज्यावेळी तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असता त्यावेळी तर तो जास्तच जोशपूर्ण असतो. तुम्ही माझ्या कालच्या कृतीवरून माझा द्वेश करा किंवा प्रेम करा मात्र मी एक योद्धा आहे. ज्यावेळी माझ्या खेळाडूंना अन्यापूर्ण निर्णयापासून वाचवण्यासाठी मी हे पुन्हा करणार.'

स्टॅमिक यांना रेड कार्ड दाखवल्यानंतर त्यांना उर्वरित सामन्यात साईड लाईनवर उभे राहता आले नाही. उर्वरित सामन्यात भारताचा माजी खेळाडू महेश गवळी यांनी कोचची भुमिका बजावली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.