IND VS PAK : भारत विरुद्ध पाक पुन्हा पावसाचाच खेळ

कोलंबोत आज ९०, तर उद्या १०० टक्के मुसळधारेचा अंदाज
ind vs pak
ind vs paksakal
Updated on

कोलंबो - भारत विरुद्ध पाक... सर्वात हायव्होल्टेज सामना, मग तो साखळीतील असो वा सुपर फोरमधील. श्रीलंकेतील पाऊस काही पिच्छा सोडण्याचे नाव घेताना दिसत नाही. उद्या रविवारी आणि सोमवारी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे राखीव दिवस असूनही सामना पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

या दोन संघांत पाल्लेकेले येथील सामनाही पावसामुळे अपूर्ण राहिला. आता सुपर फोर गटातील सामने कोलंबोत होत आहेत, पण पाल्लेकेले येथील पाऊस कोलंबोत आला आहे. श्रीलंकेतील विविध हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रविवारी ९० टक्के, तर सोमवारी राखीव दिवशी १०० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ind vs pak
Mumbai News : डोंबिवलीत अपहरण करून धावत्या रिक्षात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,झटापटीत पोलिस जखमी

पाकच्या माऱ्‍याला शिंगावर घेण्याची वेळ गेल्या काही वर्षांत भारत वि. पाक सामना हा जास्त करून पाक वेगवान गोलंदाजी आणि भारतीय संघाची दर्जेदार फलंदाजी यातला मुकाबला म्हणून बघितला जातो. आशिया कपच्या साखळी स्पर्धेतील सामन्यात पाकच्या तीन वेगवान गोलंदाजांनी भारताच्या सर्वच्या सर्व दहा फलंदाजांना बाद केले असल्याने याच विषयाला परत वाचा फुटली. उद्या रविवारी सुपर फोरमधला सामना होत आहे. विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आता पाकची वेगवान गोलंदाजी शिंगावर घेण्याची वेळ आली आहे.

ind vs pak
Pune news : रघुनाथ कुचिक यांचा जामीन न्यायालयाने केला रद्द

भारत-पाकिस्तान सामन्याला क्रिकेटच्या सकारात्मक खुन्नसची किनार असते, म्हणूनच क्रिकेटप्रेमी हा सामना अनुभवायला उत्सुक असतात. रविवारचा सामना त्याला अपवाद नसेल. दोन्ही संघ संपूर्ण ताकदीचा अंदाज घ्यायला पहिल्या निवडीचा संघ मैदानात उतरवतील.

ind vs pak
Pune News : कीर्तनातून प्रबोधन,भजनी मंडळांचाही समावेश

कागदावर पाकिस्तानचा संघ त्यांच्या संघात असलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या पर्यायामुळे किंचित जास्त ताकदवान भासतो आहे.प्रतिहल्ला करणे गरजेचे पाक संघातील तीनही वेगवान गोलंदाज भिन्न शैलीचा तिखट मारा करतात.

शाहीन शाह आफ्रिदी डाव्या हाताने एकाच टप्प्यावर गोलंदाजी करून दोनिही बाजूला स्विंग करायचे कसब राखून आहे. नसीम शाह वेगाने मारा करताता टप्पा पडल्यावर बाहेर जाणारा चेंडू टाकण्यात पटाईत आहे. हॅरिस रौफ सर्वांत जास्त वेगाने मारा करतो. तसेच चेंडू न आपटता तो उसळी मिळवू शकतो. भारतीय संघाला कधी ना कधी तरी बॅटचा धाक दाखवून या तीन गोलंदाजांवर हल्ला चढवावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.