IND Vs PAK : कुलदीपच्या फिरकीपुढे हतबल, पाकिस्तान 128 धावात गारद

India vs Pakistan Live Score Asia Cup 2023 Super
India vs Pakistan Live Score Asia Cup 2023 Super sakal
Updated on

India vs Pakistan Live Score Asia Cup 2023 Super 4 : आशिया कप 2023 च्या सुपर 4 मध्ये भारताने पाकिस्तानचा 229 धावांनी पराभव केला. भारताचे 357 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या पाकिस्तानला 32 षटकात 128 धावांपर्यंतच मजल मारता आली.

भारताकडून कुलदीप यादवने 25 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानचे नसीम शाह आणि हारिस यांनी दुखापतीमुळे फलंदाजी केली नाही.

तत्पर्वी, आशिया कप सुपर 4 मधील भारत पाकिस्तान सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. राखीव दिवशी भारताने आपला डाव 2 बाद 147 धावांपासून पुढे सुरू केला.

भारताच्या विराट कोहली आणि केएल राहुल या जोडीने राखीव दिवशी पाकिस्तानची चांगलीच धुलाई केली. वरूणराजाच्या कृपेमुळे भारतीय संघाला पाकिस्तानच्या गोलंदाजांना सलग दोन दिवस दमवले.

विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी करत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी (233) भागीदारी रचली. या दोघांनी भारताला 50 षटकात 2 बाद 356 धावा केल्या. विकाट कोहलीने 94 चेंडूत नाबाद 122 धावा ठोकल्या तर केएल राहुलने 106 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.

121-7 (30.4 Ov) : कुलदीप यादवचा भेदक मारा

पाकिस्तानची अवस्था 5 बाद 95 अशी अवस्था झाल्यानंतर कुलदीप यादवने पाकिस्तानच्या तळातील फलंदाजांना फारशी वळवळ करण्याची संधी दिली नाही. त्याने शादाब खान आणि इफ्तिकार अहमदला बाद करत पाकिस्तानची अवस्था 7 बाद 121 धावा अशी केली.

96-5 : पाकिस्तानचा निम्मा संघ गारद 

भारताचे 357 धावांचे आव्हान पार करताना पाकिस्तानचा निम्मा संघ हा शंभर धावांच्या आतच गारद झाला. कुलदीप यादवने आगा सलमानला 23 धावांवर बाद करत पाकिस्तानला पाचवा धक्का दिला. त्याने आपली दुसरी शिकार टिपली.

आगा सलमानच रक्त सांडलं

भारताने पाकिस्तानची अवस्था 3 बाद 47 धावा अशी केल्यानंतर आगा सलमान आणि फकर झमान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलदीप यादवने झमानला 27 धावांवर बाद केले. यानंतर सलमान आणि इफ्तिकार यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रविंद्र जडेजाला स्वीप करण्याच्या नादात सलमानच्या चेहऱ्यावर चेंडू लागला. यामुळे त्याच्या नाकाजवळून रक्त येऊ लागले होते. त्याच्यावर उपचार करण्यासाठी काही काळ सामना थांबला होता.

47-3  : सामना सुरू होताच शार्दुलने दिला धक्का

पावसाच्या व्यत्ययानंतर सामना पुन्हा सुरू झाला. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मोहम्मद रिझवानला 2 धावांवर बाद करत पाकिस्तानला तिसरा आणि मोठा धक्का दिला.

पाऊस भारताचा खेळ बिघडवणार? 

भारत - पाकिस्तान सामन्यात राखीव दिवशी देखील पावसाचा खेळ सुरू झाला आहे. पाकिस्तानच्या डावाची 11 षटके झाल्यानंतर पाऊस आल्याने डकवर्थ लुईस नियम देखील लागू होत नाही.

डकवर्थ लुईस नियम लागू होण्यासाठी पाकिस्तानने किमान 20 षटके फलंदाजी करणे गरजेचे आहे. जर पाऊस थांबला नाही तर सामना रद्द करून दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात येईल. याचा फटका भारताला बसू शकतो. भारत या सामन्यात आघाडीवर आहे.

पावसाची जोरदार बॅटिंग 

कोलंबो येथे भारत - पाकिस्तान सामन्यावेळी राखीव दिवशी देखील पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. यामुळे भारताच्या कामगिरीवर पुन्हा पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सामन्यात  पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय

भारत - पाकिस्तान सामन्याला पुन्हा एका पावसाचा फटका बसला असून पाकिस्तानने 11 षटके फलंदाजी केल्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.

पाकिस्तानला दोन धक्के 

भारताचे 357 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला भारताने सुरूवातीलाच दोन धक्के दिले. जसप्रीत बुमराहने इमाम उल हकला 9 तर हार्दिक पांड्याने कर्णधार बाबर आझमला 11 धावांवर बाद करत पाकिस्तानची अवस्था 2 बाद 43 धावा अशी केली.

पाकिस्तानची सर्वोच्च धुलाई

भारताने पाकिस्तानविरूद्ध 356 धावसंख्या उभारली. ही पाकिस्तानविरूद्धची वनडेमधील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. यापूर्वी विशाखापट्टणम येथील सामन्यात देखील भारताने पाकिस्तानविरूद्ध 356 धावा ठोकल्या होत्या. विराट कोहलीने 122 तर केएल राहुलने 111 धावा ठोकत शतकी खेळी केली.

केएल राहुलचे दमदार शतक 

जवळपास पाच ते सहा महिन्यांनी मैदानावर परतलेल्या केएल राहुलने पाकिस्तानविरूद्ध शतकी खेळी करत आपले पुनरागमन जोरदार साजरे केले. त्याने विराट कोहली सोबत द्विशतकी भागीदारी

भारत 250 पार

केएल राहुल पाठोपाठ विराट कोहलीने देखील आपले अर्धशतक पूर्ण करत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर भारताने आपली धावसंख्या 250 च्या पार पोहचवली.

केएल राहुलचे अर्धशतक 

केएल राहुलने अनके महिन्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करत पाकिस्तान विरूद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने विराट कोहलीसोबत भागीदारी रचत भारताला 200 पार पोहचवले. विराट देखील आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला.

भारत 150 च्या पार 

पावसाच्या व्यत्ययानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने आपली भागीदारी पुढे नेत संघाला 150 पार पोहचवले.

पाकिस्तान संघाला मोठा धक्का!

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ आज गोलंदाजी करणार नाही. पाकिस्तान संघासाठी हा मोठा धक्का आहे. रौफने या सामन्यात पाच षटके टाकली असून 27 धावा दिल्या आहेत. रौफ पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो खेळल्यास त्याची दुखापत आणखी वाढू शकते. पाकिस्तानी संघ व्यवस्थापन विश्वचषकापूर्वी रौफला दुखापत करू इच्छित नाही. यामुळे तो आज गोलंदाजी करणार नाही.

पाऊस थांबल्यानंतर अंपायरने घेतला मोठा निर्णय! 4.40 वाजता सुरू होणार सामना मात्र षटके किती

नवीनतम अपडेट असा आहे की, सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.40 वाजता सुरू होईल. भारत 24.1 षटकांपासून डाव खेळण्यास सुरुवात करेल. षटकांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. जर पाऊस पडला नाही तर दोन्ही संघांना 50-50 षटके खेळण्याची संधी मिळेल.

कोलंबोमध्ये पाऊस थांबला! 4:20 ला अंपायर घेणार निर्णय

कोलंबोमध्ये पाऊस थांबला आहे. मात्र, ढगाळ वातावरण आहे. मैदानातून कव्हर काढले जात आहेत. मैदान कोरडे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते सुकवण्यात मैदानवाले व्यस्त आहेत. 4:20 ला अंपायर पुढील पाहणी करणार आहे.

चाहत्यांसाठी वाईट बातमी! अजूनही कोलंबोमध्ये पाऊस, किती वाजता सुरू होणार सामना?

चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. कोलंबोमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. आज भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. राखीव दिवस ठेऊन काही फायदा होणार नाही. ग्रुप स्टेजमध्ये हे दोन संघ आमनेसामने आले होते तेव्हाही तो सामना पावसामुळे वाहून गेला होता.

कोलंबोमध्ये आज 'रिझर्व्ह डे'लाही मुसळधार पाऊस, सामना किती वाजता होणार सुरू?

भारत-पाकिस्तान सामन्यात खरं तर 'रिझर्व्ह डे'चा काही फायदा होणार नाही, कारण Accuweather नुसार, आज पावसाची शक्यता....

सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा - Asia Cup 2023 Ind Vs Pak : 'रिझर्व्ह डे' चा फायदा नाहीच? भारत-पाकिस्तान सामन्यावर 'हा' मोठा धोका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.