Ind Vs Pak: 'फादर ऑफ पाकिस्तान' : विराटच्या 13,000 धावा पूर्ण झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

युनायटेड नेशन्सनं हे जाहीर केल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय, अशा शब्दांत नेटकरी सोशल मीडियात मजा घेत आहेत.
Virat Kohli
Virat Kohli
Updated on

नवी दिल्ली : विराट कोहलीनं कमी सामन्यांत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत १३००० धावांचा टप्पा पार केल्यानंतर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर रिअॅक्शन यायला लागल्या आहेत. कोहलीनं हे रेकॉर्ड नेमकं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केल्यानंतर भारतीय चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळालं. कोहली 'फादर ऑफ पाकिस्तान' असल्याचा ट्रेन्डच त्यामुळं सुरु झाला. (Ind Vs Pak ODI Vira Kohli Father of Pakistan Memes on social media after 13000 runs completed)

GOAT

हा ट्रेन्ड करताना नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट ट्विट केले आहेत. एकानं म्हटलं, "विराट कोहलीनं ४७व्या वनडेमध्ये शतक करणं स्वाभाविक होतं. काय कमबॅक केलंय विराटनं 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' किंग कोहली बनलाय फादर ऑफ पाकिस्तान. या असामान्य माणसानं १३,००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे"

पुन्हा एकदा सरेंडर

'फादर ऑफ पाकिस्तान'नं त्यांना यंदा कोलंबोत पुन्हा एकदा सरेंडर करायला भाग पाडलं, असं एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. यासोबत त्यानं १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर जो शस्त्रसंधीचा करार झाला होता त्या क्षणाचा ओरिजिनल फोटो शेअर करत त्याखाली संपूर्ण टीम इंडिया आणि मध्यभागी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचा फोटो 'लावत सरेंडर २०२३ अॅट कोलंबो' असं म्हटलंय.

पाकिस्तानी बॉलर्सची धुलाई

तर आणखी एकानं WWFच्या फाईटचा एक व्हिडिओ शेअर करत फिफ्टी फॉर रोहित शर्मा, फिफ्टी फॉर शुभम गिल, हंड्रेड फॉर विराट कोहली, हंड्रेड फॉर केएल राहुल असं कॅप्शन देत अशा प्रकारे भारतीय बॅट्समननं पाकिस्तानी बॉलर्सची धुलाई केल्याचं म्हटलं आहे.

सुनील शेट्टीनं लोकांना धुतलं

तर एका युजरनं थेट अभिनेता सुनील शेट्टीचा 'चुप चुप के' सिनेमातील हाणामारीचा एक व्हिडिओ शेअर करत त्याचा जावई असलेल्या केएल राहुलवर टिप्पणी केली आहे. "भारत-पाकिस्तान सामन्याआधी राहुलला ट्रोल करणाऱ्यांना आता त्याच्या शतकी खेळीनंतर झोडपून काढताना सुनील शेट्टी" असं कॅप्शन दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.