India vs Pakistan : आज रंगणार थरार! भारत पाकिस्तानला फेकणार स्पर्धेतून बाहेर?

भारताला आत्मसंतुष्टता टाळावी लागणार! पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आज लढत
India vs Pakistan Asian Champions Trophy hockey 2023
India vs Pakistan Asian Champions Trophy hockey 2023
Updated on

India vs Pakistan Asian Champions Trophy hockey 2023 : भारत - पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकातील लढत रंगणार आहे. भारताचा हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून पाकिस्तानच्या संघासाठी आजची लढत उपांत्य फेरीत पाऊल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. दोन देशांमध्ये होणाऱ्या अटीतटीच्या लढतीवर लक्ष टाकता भारतीय संघाला आत्मसंतुष्टता टाळावी लागणार आहे.

India vs Pakistan Asian Champions Trophy hockey 2023
WI vs IND 3rd T20I : सूर्यकुमार यादव - तिलक वर्माने भारताचे मालिकेतील आव्हान ठेवले जिवंत, विंडीजचा 7 विकेट्सनी पराभव

भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर नजर टाकता भारताचे पारडे जड दिसते. भारताचा संघ जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असून पाकिस्तानचा संघ १६व्या स्थानावर आहे.

भारतीय संघाने चार सामन्यांमधून तीन सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत, तर एका लढतीत बरोबरीत त्यांना समाधान मानावे लागले आहे. पाकिस्तानला चार सामन्यांमधून पाचच गुणांची कमाई करता आलेली आहे. पाकिस्तानचे दोन सामने बरोबरीत राहिले असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. त्यांना फक्त चीनविरुद्धच्या लढतीत विजय मिळवता आला आहे.

याप्रसंगी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने बचावावर लक्ष केंद्रित करावे लागणार, असे सांगितले. तो म्हणाला, आम्हाला बचावाकडे गांभीर्याने बघावे लागणार आहे. प्रतिस्पर्ध्यांना सहज पेनल्टी कॉर्नर द्यायला नकोत. गोलरक्षकाच्या समोरील बॉक्समध्ये खेळाडूंकडून चुका व्हायला नकोत, असेही त्याने नमूद केले.

India vs Pakistan Asian Champions Trophy hockey 2023
Suryakumar Yadav : अखेर सूर्योदय झाला! मुंबई इंडियन्सच्या जोडीनं हार्दिकची लाज वाचवली; आव्हान ठेवलं जिवंत

दरम्यान, भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी सलग सामन्यांच्या आयोजनावर टीका केली. ते म्हणाले, सलग सामने खेळाडूंसाठी आव्हानात्मक असतात. सलग सामन्यांमुळे खेळाडूंच्या फॉर्मवरही परिणाम होऊ शकतो. तसेच त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवरही परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.

विजयाची आवश्‍यकता

पाकिस्तानला उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्‍चित करण्यासाठी भारताला हरवावे लागणार आहे; पण भारताविरुद्ध पराभव झाल्यास पाकिस्तानला इतर लढतींच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत चीनने जपानला हरवण्याची त्यांना वाट बघावी लागणार आहे.

जपानने या लढतीत विजय मिळवल्यास गोलफरक मोठा नसावा, अशीही त्यांच्याकडून प्रार्थना करण्यात येईल. तसेच मलेशियाने दक्षिण कोरियाला मोठ्या गोलफरकाने हरवायला हवे, असेही त्यांना वाटत असेल.

पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीची शक्यता

भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून गुणतालिकेत हा संघ पहिल्या स्थानावर राहण्याचा प्रयत्न करील. पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारत - पाक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उपांत्य फेरीची लढत होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()