Asia Cup 2023 IND vs PAK: सामना रद्द झाल्यास कोणाला होणार फायदा? भारत की पाकिस्तान, जाणून घ्या समीकरण

Asia Cup 2023 IND vs PAK
Asia Cup 2023 IND vs PAK
Updated on

Asia Cup 2023 IND vs PAK Weather Report : सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. हा सामना 10 तारखेला कोलंबोमध्ये होणार आहे. या सामन्याची सर्व चाहते वाट पाहत आहेत. कारण दोन्ही देशांचा मागील सामना पावसाने खराब केला होता.

पण याच दरम्यान एक बातमी समोर येत आहे, जी जाणून घेतल्यानंतर चाहत्यांची निराशा होईल. हवामान खात्याने 10 तारखेच्या दिवसाचे अपडेट दिले आहेत. खरंतर त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता 90 टक्के आहे. म्हणजे नाणेफेक बघायलाही मिळणार नाही.

Asia Cup 2023 IND vs PAK
Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी बुमराह पोहोचला श्रीलंकेत, कोण होणार प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर?

आता अशा परिस्थितीत एक प्रश्न उपस्थित होतो की, समजा सामना रद्द झाला तर त्याचा फायदा कोणत्या संघाला होईल. तस पाहिला गेलो तर कोणत्याही संघाला याचा फायदा होणार नाही. पण, भारताला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो हे वास्तव आहे. त्याचवेळी पाकिस्तानचे नुकसान होईल, पण भारताच्या तुलनेत कमी असेल.

Asia Cup 2023 IND vs PAK
Ind vs Pak Series : भारत अन् पाकिस्तान यांच्यात लवकरच होणार द्विपक्षीय मालिका? BCCI अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

आता संघांच्या कर्णधाराच्या नियोजनाबद्दल सांगायचे तर, संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. कारण नंतर कोणालाच DLS बद्दल खात्री नाही की लक्ष्य काय होईल. त्यामुळे कोणताही कर्णधार धोका पत्करू इच्छित नाही.

पाकिस्तान संघाने सुपर-4 मध्ये यापूर्वीच एक सामना जिंकला आहे. दुसरीकडे, भारताचे खाते अद्याप उघडलेले नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी 2 गुण खूप महत्त्वाचे आहेत. जर पाऊस पडला तर पाकिस्तान 3 गुणांसह पुढे जाईल, तर भारताचा फक्त 1 गुण राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.