T20 WC23 : पाकविरुद्धच्या लढतीला स्मृती मुकणार! कर्णधार हरमनप्रीतवरही प्रश्‍नचिन्ह

भारतीय क्रिकेट संघाला धक्का
T20 World Cup 2023 Smriti Mandhana
T20 World Cup 2023 Smriti Mandhana
Updated on

T20 World Cup 2023 Smriti Mandhana : ट्वेंटी-२० विश्‍वकरंडकातील सलामीची लढत खेळण्याआधीच भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का बसला आहे. अनुभवी सलामी फलंदाज स्मृती मानधना ही दुखापतीमुळे १२ फेब्रुवारी रोजी केपटाऊन येथे होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळू शकणार नाही. तिच्या अनुपस्थितीत भारतीय संघावरील दडपण वाढण्याची शक्यता आहे.

T20 World Cup 2023 Smriti Mandhana
IND vs AUS 1st Test: रोहितची तळपली बॅट; शतकासह इतिहासही घडवला

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ६ फेब्रुवारीला सराव लढत पार पडली. या लढतीदरम्यान क्षेत्ररक्षण करताना स्मृतीच्या बोटाला दुखापत झाली. या लढतीत स्मृती सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तसेच तीन चेंडूंमध्ये तिची खेळीही संपुष्टात आली. याबाबत आयसीसीच्या सूत्रांकडून माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून सांगण्यात आले की, सराव सामन्यात स्मृतीला दुखापत झाली आहे. टी-२० विश्‍वकरंडकाला ती मुकणार हे आताच सांगता येणार नाही; पण पाकविरुद्धच्या लढतीत ती खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत झालेल्या दुखापतीनंतर स्मृती बुधवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सराव लढतीतही खेळू शकली नाही.

T20 World Cup 2023 Smriti Mandhana
IND vs AUS 1st Test Day 2 : भारताकडे भक्कम आघाडी; दोन डावखुऱ्यांची दमदार फलंदाजी

महिला संघासमोरील आव्हान

भारतीय महिला संघाचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान व वेस्ट इंडीज या देशांचा समावेश आहे. भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानशी १२ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ १५ फेब्रुवारीला वेस्ट इंडीजशी, १८ फेब्रुवारी इंग्लंडशी आणि २० फेब्रुवारीला आयर्लंडशी दोन हात करील.

T20 World Cup 2023 Smriti Mandhana
IND vs AUS : कांगारूंना रोहित, जडेजाने दिला फलंदाजीचा धडा; पदार्पण करणाऱ्या मर्फीला 5 विकेट्सची बर्फी

कर्णधार हरमनप्रीतवरही प्रश्‍नचिन्ह

स्मृतीला दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळता येणार नाही. याचसह भारतासाठी आणखी एक चिंतेची बाब आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हिचाही खांदा दुखावला आहे. दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेदरम्यान तिला ही दुखापत झाली होती. यामधून ती पूर्णपणे बरी झाली नाही. टी-२० विश्‍वकरंडकाआधी झालेल्या सराव लढतींमध्ये तिने फलंदाजीही केलेली नाही. यावर हरमनप्रीत म्हणाली, सध्या शरीर तंदुरुस्त आहे. यामध्ये आणखी सुधारणा होऊ शकेल. विश्रांतीची गरज आहे, असे तिने पुढे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.