Ind vs Pak World Cup 2023 Babar Azam : भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचा 100 टक्के विजयाचा विक्रम कायम ठेवला आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग 8व्यांदा पाकिस्तान संघाचा पराभव केला.
नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव अवघ्या 191 धावांत गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने अवघ्या 30.3 षटकांत 3 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले.
भारताविरुद्ध विजयाचे स्वप्न घेऊन आलेल्या पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या फलंदाजीने पूर्णपणे डोके टेकले. सामन्यानंतर बाबर आझमनेही हे मान्य केले आणि भारतीय कर्णधाराने अप्रतिम कामगिरी केली.
सामन्यानंतर बाबर आझम म्हणाला की, 'आम्ही चांगली सुरुवात केली होती. पहिली विकेट पडल्यानंतर माझ्यात आणि रिझवानमध्ये चांगली भागीदारी झाली. रिझवानसोबत सामना खेळत होतो तेव्हा मला अगदी सामान्य क्रिकेट खेळायचे होते. पण सगळं काही अचानक घडलं. आम्ही आमची खेळी ज्या पद्धतीने आखली होती त्याप्रमाणे आम्ही संपवू शकलो नाही.”
पाकिस्तान संघाने 155 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. इथून टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कहर केला. अवघ्या 36 धावा करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ऑल आऊट झाला. याचा अर्थ या कालावधीत त्यांच्या संघाने 8 विकेट गमावल्या. कुलदीप यादवने एका षटकात दोन विकेट घेतल्या, त्यानंतर बुमराहनेही दोन विकेट घेतल्या.
बाबर पुढे म्हणाला की, आम्ही भारताविरुद्धच्या या सामन्यात ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, त्यानुसार आमचा उद्देश किमान 280 ते 290 धावा करण्याचा होता. आम्ही नवीन चेंडूचा योग्य वापर करू शकलो नाही. रोहित शर्माने आमच्याविरुद्ध अतिशय शानदार खेळी खेळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.