Ind vs Sa 2nd Test : केपटाऊन टेस्ट सामन्यातून दोन गोलंदाजांचा पत्ता कट, कर्णधार रोहित कोणाला देणार संधी?

ind vs aus-1st-test-playing 11 captain Rohit Sharma
ind vs aus-1st-test-playing 11 captain Rohit Sharma
Updated on

South Africa vs India 2nd Test : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 32 धावांनी गमावल्यानंतर भारत 0-1 ने पिछाडीवर आहे.

रोहित शर्मा आणि कंपनीचे लक्ष केपटाऊन कसोटीत विजयाकडे असेल आणि मालिका 1-1 अशी संपुष्टात येईल. पण भारताला हा कसोटी सामना जिंकायचा असेल तर त्यांना त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्कीच बदल करावे लागतील.

ind vs aus-1st-test-playing 11 captain Rohit Sharma
VIDEO: 'मला वाटलं भाऊ, गेला...' ऋषभ पंतच्या अपघातानंतर एक वर्षांनी मित्राने केला मोठा खुलासा

सेंच्युरियन कसोटीत भारताची कामगिरी अत्यंत खराब होती. दुसऱ्या कसोटीत भारताच्या प्लेइंग 11 मध्ये किमान 2 बदल होण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजा तंदुरुस्त नसल्यामुळे सेंच्युरियन कसोटीत खेळू शकला नाही, पण दुसऱ्या कसोटीपूर्वी तो तयार दिसत आहे. आणि नेटमध्ये घाम गाळत आहे. जडेजाच्या जागी संघात कोणाची वर्णी लागते हे पाहणे बाकी आहे, तर मुकेश कुमारलाही केपटाऊन कसोटीत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ind vs aus-1st-test-playing 11 captain Rohit Sharma
Sa vs Ind 2nd Test : विराट कोहलीचा उत्तराधिकारी 'प्रिन्स' शुभमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये होतोय का फ्लॉप?

रवींद्र जडेजा संघात आल्यामुळे भारताच्या फलंदाजीत आणखीन भर पडेल आहे आणि त्याची तगडी लाईन आणि लेन्थ बॉलिंग आफ्रिकन फलंदाजांना अडचणीत आणू शकते. अश्विनच्या जागी जडेजाचा संघात समावेश करू शकतो, असे चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.

पण रोहित शर्मा ही चूक करणार नाही. केपटाऊनची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल आहे, त्यामुळे रोहित अश्विन आणि जडेजा या दोघांचाही प्लेइंग 11 मध्ये समावेश करू शकतो.

अशा स्थितीत अश्विन बाहेर जाणार नाही, तर संघाबाहेर कोण असेल, असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. गेल्या सामन्यात पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात बाहेर जाऊ शकतो. कृष्णाने पहिल्या कसोटीत 20 षटकांत 93 धावांत एक बळी घेतला होता.

प्लेइंग इलेव्हनमधील दुस-या बदल म्हणजे शार्दुल ठाकूर बाहेर जाऊ शकतो. शनिवारी असे वृत्त आले होते की नेट सत्रादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती, तर सेंच्युरियन कसोटीतही त्याची कामगिरी विशेष नव्हती. अ

शा परिस्थितीत भारत तिसरा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज मुकेश कुमारसोबत केपटाऊनला जाऊ शकतो. आता 3 जानेवारीला शार्दुल ठाकूरचा फिटनेस कसा आहे आणि रोहित शर्मा यावर काय निर्णय घेतो हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.