IND vs SA : वर्ल्ड कप भारत जिंकणार; काय आहे दक्षिण आफ्रिका अन् 2011 चं कनेक्शन?

आफ्रिकेकडून हरल्यानंतरही का आहेत भारतीय चाहते खुश
ind vs sa match t20 world cup 2022 team india defeat similar to 2011 world cup
ind vs sa match t20 world cup 2022 team india defeat similar to 2011 world cup sakal
Updated on

India vs South Africa t20 world cup : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पर्थमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 134 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी दोन चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. सध्याच्या टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाचा हा पहिलाच पराभव आहे. या पराभवामुळे भारतीय चाहते निराश झाले नाही. या पराभवात काही तरी दडले आहे जे 15 वर्षांची प्रतीक्षा संपवू शकते.

ind vs sa match t20 world cup 2022 team india defeat similar to 2011 world cup
Dinesh Karthik : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये ऋषभ पंतची ग्रँड एन्ट्री ?

भारतीय संघ 2007 नंतर दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर कब्जा करू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवाने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची पुनरावृत्ती केली आहे, जिथे भारतीय संघ एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनण्यात यशस्वी झाला होता. 2011 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने एकही सामना गमावला नाही. त्या 50 षटकांच्या विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिकेला 297 धावांचे लक्ष्य दिले होते, जे आफ्रिकन संघाने दोन चेंडू बाकी असताना पूर्ण केले. यावेळीही दक्षिण आफ्रिकेने 2 चेंडू राखून टी-20 विश्वचषक जिंकला आहे. म्हणजेच 2011 च्या विश्वचषकाचा योगायोग पुन्हा एकदा घडला आहे.

ind vs sa match t20 world cup 2022 team india defeat similar to 2011 world cup
Video : "...चुना लगा दिया रे!"; भारताच्या पराभवावर पाकिस्तान संतापला!

2011 च्या विश्वचषकातही इंग्लंडचा आयर्लंड संघाकडून पराभव झाला होता. यावेळीही टी-20 विश्वचषकात आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताने अधिकृतपणे दोन सराव सामने नियोजित केले होते. पहिला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि दुसरा न्यूझीलंड संघाविरुद्ध होता. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतही भारताने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळला होता.

विशेष बाब म्हणजे 2011 च्या विश्वचषकात नेदरलँड आणि बांगलादेशचा संघ भारताच्या गटात होता. या सर्व योगायोगाने भारतीय संघ 2011 च्या विश्वचषकाप्रमाणे या वेळीही जेतेपद पटकावू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.