मितालीचा वर्ल्ड रेकॉर्ड; 39 व्या वर्षी तारुण्यातला तोरा

Mithali Raj
Mithali RajSakal
Updated on

ख्राईस्टचर्च : महिला क्रिकेटमधील आयकॉन असलेल्या मिताली राजनं (Mithali Raj ) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत आश्वासक अर्धशतक झळकावले. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना ख्राईस्टचर्च येथील हॅगले ओव्हलच्या मैदानातील सामना भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. या सामन्यातील विजयच भारतीय संघाला सेमी फायनलचं तिकिट मिळवून देऊ शकतो.

Mithali Raj
IPL 2022 Mystery Girl : 'मिस्ट्री गर्ल'मुळे कॅमेरामन ट्रोल

सलामीची बॅटर शफाली वर्मा (Shafali Verma) आणि स्मृती मानधना 71 (84) (Smriti Mandhana) यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर मिताली राजनंही अर्धशतक झळकावले. तिने 84 चेंडूत 68 धावा केल्या. या अर्धशतकाच्या जोरावर तिने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे नोंदवला. महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम तिने करुन दाखवला. याशिवाय 39 वर्षीय मिताली वर्ल्ड कपमध्ये अर्धशतक करणारी सर्वात तरुण आणि वयोवृद्ध भारतीय बॅटरही ठरलीये.

Mithali Raj
वर्ल्ड कप स्पर्धेत स्मृती मानधनानं सर केला 500 धावांचा टप्पा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.