IND vs SA दुसऱ्या टी 20 सामन्याची तिकिटे घेताना महिलांची तुंबळ हाणामारी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यात दुसरा टी २० सामना कटक स्टेडिअमवर खेळवण्यात येणार आहे.
IND vs SA
IND vs SAesakal
Updated on

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यात पहिला टी २० सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारतावर ७ विकेट्सनी विजय मिळवला. यानंतर आता दुसरा सामना ओडिशामधील कटक स्टेडिअमवर १२ जूनला खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, या सामन्याची तिकीट विक्री सुरु आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये महिलांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली आहे.

IND vs SA
IND vs SA Live : डुसेन - मिलरने भारताचा विजयी घास हिरावला

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तिकीट खरेदीसाठी लाईन लागली होती. यावेळी काही महिला आपली जागा सोडून पुढे येण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे महिलांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत हलका लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

कटक स्टेडिअमवर २०१९ नंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. कडक उन्हात उभे राहत प्रेक्षक तिकीट खरेदी करताना पाहायला मिळत आहेत.

IND vs SA
बाकीच्या बॉलर्सची पिटाई होत होती अन् आवेशच्या यॉर्करने बॅटचे केले दोन तुकडे

पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर आणि रासी वेन डुसेनने तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची नाबाद भागीदारी रचत भारताच्या सलग 13 वा टी 20 सामना जिंकण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले. डुसेनने नाबाद 46 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. त्याने श्रेयस अय्यरने दिलेल्या जीवनदानाचा चांगलाच फायदा उचलला. तर डेव्हिड मिलरने 31चेंडूत 64 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताचे 212 धावांचे आव्हान 19.1 षटकात पार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.