IND vs SA U19 WC: श्वेता सेहरावत समोर शेफाली वर्मा ही पडली फिकी; ठोकल्या 92 धावा

भारताची विजयी सुरुवात! कर्णधार शेफालीने एका षटकात केल्या 26 धावा
IND vs SA U19 Women T20 World Cup
IND vs SA U19 Women T20 World CupSAKAL
Updated on

IND vs SA U19 Women T20 World Cup : शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने १९ वर्षांखालील महिलांच्या पहिल्यावहिल्या विश्वकरंडक ट्वेन्टी- २० क्रिकेट स्पर्धेत यजमान दक्षिण आफ्रिकेचा सात विकेटने धुव्वा उडवला. सलामीवीर श्वेता शेरावतने झंझावाती नाबाद ९२ धावांची खेळी केली.

IND vs SA U19 Women T20 World Cup
IND vs SL: Playing-11 मध्ये थेट एन्ट्री! रोहित 'या' खेळाडूची कारकीर्द वाचवणार?

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने २० षटकांत ५ बाद १६६ धावा केल्या. ही धावसंख्या भारताला आव्हानात्मक ठरेल अशी शक्यता होती, परंतु श्वेता आणि शेफाली यांनी हे आव्हान किरकोळ ठरेल इतकी तुफानी टोलेबाजी केली.

श्वेताने अवघ्या ५७ चेंडूत नाबाद ९२ धावा केल्या. यात तिने २० चौकार मारले, शेफालीने ४५ धावांसाठी अवघ्या १६ चेंडूंचाच सामना केला. तिचा आंतरराष्ट्रीय अनुभव आज भारताच्या उपयोगी पडला.

IND vs SA U19 Women T20 World Cup
IND vs SL : भारतीय संघाला मोठा धक्का; द्रविडची तब्येत बिघडली, चेकअपसाठी बेंगळुरूला रवाना

संक्षिप्त धावफलक :

दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ५ बाद १६६ (एलनांद्री रेन्सबर्ग २३- १३ चेंडू, २ चौकार, २ षटकार, सिमोली लॉरेन्स ६१- ४४ चेंडू, ९ चौकार, १ षटकार, मॅडिसन लँडसमन ३२- १७ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, कार्बो मेसो नाबाद १९- ११ चेंडु, ३ चौकार, मिने स्मित नाबाद १६- ९ चेंडू, ३ चौकार, शेफाली वर्मा ४-०-३१-२, पाव चोप्रा ४-०-१५-१) पराभूत वि.

भारत : १६.३ षटकांत ३ बाद १७० (श्वेता शेरावत नाबाद ९२-५७ चेंडू, २० चौकार, शेफाली वर्मा ४५- १६ चेंडू, ९ चौकार, १ पटकार, गोगादिल त्रिशा १५-११ चेंडू, ३ चौकार,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()