IND vs SA Weather : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाचे विघ्न? जाणून घ्या कसे असेल कोलकाताचे हवामान

आज (रविवार) दक्षिण आफ्रीकेसोबत भारतीय संघाचा सामना होणार आहे.
ind vs sa wc 2023 kolkata weather forecast latest update India Vs South Afrika match marathi news
ind vs sa wc 2023 kolkata weather forecast latest update India Vs South Afrika match marathi news
Updated on

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. अशातच आज (रविवार) दक्षिण आफ्रीकेसोबत भारतीय संघाचा सामना होणार आहे. या दोन दमदार संघातील सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. दोन्ही संघ कोलकाता येथील इडन गर्डन्स येथे हा सामना खेळणार आहेत. भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये एकही सामना हरला नाहीये, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रीकेचा संघाने देखील दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी सात पैकी सहा मॅच जिंकल्या आहेत.

भारत जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा आजचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहून सेमीफायनल मध्ये पोहचू शकतो. भारताचा गट फेरीतील शेवटचा सामना 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँडशी होणार आहे. टीम इंडियाला यावेळी एकही सामना न गमावता वर्ल्ड कप जिंकाण्याची संधी आहे. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेत एकही सामना हरला नव्हता.

ind vs sa wc 2023 kolkata weather forecast latest update India Vs South Afrika match marathi news
Hardik Pandya : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का! उपकर्णधार स्पर्धेतून बाहेर, 'या' खेळाडूची संघात एन्ट्री

पाऊस येणार?

कोलकात्याच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर नोव्हेंबरच्या आसपास येथे सतत बदल होत असतात. मान्सून संपून आता हिवाळा सुरू होत आहे, असे असतानाही कधीही पाऊस पडू शकतो, असे मानले जात आहे. सामन्यादरम्यान बहुतांश वेळा आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात 28 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याचा अंदाज असून, संध्याकाळी ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत किंचित खाली येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

ind vs sa wc 2023 kolkata weather forecast latest update India Vs South Afrika match marathi news
IND vs SL : भारतीय गोलंदाजांना देण्यात येणारे चेंडू तपासले पाहिजेत... पाकिस्तानच्या पोटात लागलं दुखायला

पाऊस झाला तर काय?

जर कोलकाता येथे पाऊस झाला तर मॅचच्या ओव्हर कमी केल्या जाऊ शकतात. त्यामुळे प्रेक्षकांना सामना पूर्ण पाहता येणार नाही. पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघाना एक एक गुण मिळेल. स्पर्धेत नॉकआउट सामन्यादरम्यान रिझर्व डे चा नियम ठेवण्यात आला आहे. मात्र प्रेक्षकांना सामना पूर्ण पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.