IND vs SA World Cup 2023 : भारताला आम्ही हरवले आहे; रॅसी वॅन डर ड्युसेन

दक्षिण आफ्रिकेचा माईंड गेम
IND vs SA World Cup 2023
IND vs SA World Cup 2023sakal
Updated on

पुणे : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने बुधवारी पुण्यामध्ये न्यूझीलंडचा १९० धावांनी धुव्वा उडवत एकदिवसीय विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. दक्षिण आफ्रिकन संघाचा पुढील सामना येत्या पाच नोव्हेंबरला भारताशी होणार आहे.

या लढतीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या फॉर्ममध्ये असलेल्या रॅसी वॅन डर ड्युसेन याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, भारतीय संघ चमकदार कामगिरी करीत आहे; पण आम्ही याआधीही भारताला भारतामध्ये हरवले आहे. आमच्यासमोर दबावाखाली आपला खेळ उंचावण्याचे आव्हान असणार आहे.

यजमान भारतीय संघानेही आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत त्यांनी ठसा उमटवला आहे; पण आम्हाला आमच्या मजबूत बाजू माहीत आहेत. आम्ही आखलेल्या योजनांप्रमाणे खेळ केला, तर आमचा संघही त्याच तोडीचा ठरू शकतो, असा विश्‍वास त्याने पुढे व्यक्त केला.

दोन विजयांची गरज : ग्लेन फिलिप्स

न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या चार लढतींमध्ये विजय मिळवत पुढे पाऊल टाकले होते; पण त्यानंतर त्यांना भारत, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याकडून हार पत्करावी लागली. यामुळे त्यांच्या आव्हानाला धक्का बसला आहे; मात्र या पराभवांमुळे त्यांचा संघ खचून गेलेला नाही. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स याप्रसंगी म्हणतो, आम्हाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे. दोन विजय मिळवल्यास आमचा संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहे.

न्यूझीलंडला दुखापतींचा फटका

सलग तीन सामने पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघाचा पाय खोलात गेला आहे. केन विल्यमसन, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन यांच्यानंतर आता मॅट हेनरी व जेम्स निशाम यांनाही दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. शनिवारी त्यांना पाकिस्तानचा सामना करावयाचा आहे. त्याआधी न्यूझीलंडच्या संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काईल जेमिसन याला न्यूझीलंडहून बोलावण्यात आले आहे; पण शनिवारच्या लढतीत तो खेळू शकेल, असे वाटत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.