Gautam Gambhir Hardik Pandya : प्रत्येक सामन्यानंतर हार्दिकला बोलायचं नाही... गौतम गंभीरला आला राग

Gautam Gambhir Hardik Pandya Captaincy
Gautam Gambhir Hardik Pandya Captaincyesakal
Updated on

Gautam Gambhir Hardik Pandya Captaincy : भारताचा नवखा संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरूद्ध टी 20 मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात भारत हरता हरता वाचला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताचा 16 धावांनी पराभव झाला. यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली. याबाबत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने देखील आपले मत व्यक्त केले.

Gautam Gambhir Hardik Pandya Captaincy
Domestic Cricket Record : चंबळच्या खोऱ्यातला अनिल कुंबळे! हॅट्ट्रिकसह एका डावात घेतल्या 10 विकेट्स

गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला की, हार्दिक पांड्या एक कर्णधार म्हणून चांगलं काम करत आहे. प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूच्या कामगिरीचे विश्लेषण करणे योग्य नाही. भारत सामना हरलाय म्हणजे हार्दिक पांड्याने काही चुकीचं केलंय असं होत नाही. हार्दिक पांड्या नो बॉलसाठी गोलंदाजांना कंट्रोल करू शकत नाही. ही जबाबदारी गोलंदाजांचीच आहे.

गौतम गंभीर पुढे म्हणाला की, माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत हार्दिकने भारतासाठी जेवढी कॅप्टन्सी केली आहे. त्याने खरोखरचं चांगले काम केले आहे. तो मैदानावर सहजतेने वावरत आहे. तो आक्रमक मानसिकतेत मैदानावर उतरत आहे. आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उबा आहे. या छोट्या छोट्या गोष्टीच मला खास वाटतात. तो प्रत्येक गोष्ट सहजतेने समोर ठेवतोय.

Gautam Gambhir Hardik Pandya Captaincy
India Playing XI 3rd T20 : तिसऱ्या सामन्यात किती बदल; कॅप्टन पांड्या अर्शदीपसोबत गिललाही दाखवणार बाहेरचा रस्ता?

गंभीर म्हणाला की हार्दिकला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. तो अनुभवाने अजून चांगला कर्णधार होईल. त्याने जास्त क्रिकेट खेळणाऱ्या आणि कमी क्रिकेट खेळणाऱ्या दोन्ही श्रेणीतील खेळाडूंचे मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे केले आहे. हार्दिक मैदानावर चांगली उर्जा घेऊन उतरलो.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.