India vs Sri lanka 3rd ODI : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना आज तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत तिसरा एकदिवसीय सामना जिंकून पाहुण्या संघाला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. भारतीय वेळेनुसार तिसरा एकदिवसीय सामना दुपारी 1.30 पासून खेळल्या जाईल.
या सामन्यानंतर भारतीय संघाला 72 तासांपेक्षा कमी कालावधीत वनडेमध्ये न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप केल्यानंतर खेळाडूंना आगामी मालिकेसाठी मोठा आत्मविश्वास मिळेल. दुसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंवरील वर्कलोड मॅनेज करण्याच्या गरजेवर भर दिला. अशा स्थितीत या तिसऱ्या वनडेत काही खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.
खेळाडूंना विश्रांती दिल्यास सलामीवीर इशान किशन आणि मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय फलंदाजीत संधी मिळू शकते. तिसर्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा प्लेइंग-11 काहीही असो, पण अव्वल पाच फलंदाजांना गोलंदाजांसाठी अनुकूल ग्रीनफिल्ड स्टेडियमवर श्रीलंकेच्या गोलंदाजीविरुद्ध अधिक फलंदाजी करायला आवडेल, ज्यामध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्याचाही समावेश आहे.
भारतीय संघ 14 दिवसांत 50 षटकांचे सहा सामने खेळणार आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवरील कामाचा ताण हा भारतीय संघ व्यवस्थापनासाठी निश्चितच चिंतेचा विषय ठरणार आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत, मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान भारतीय आक्रमणाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे. म्हणूनच त्यांच्या कामाचा भार सर्वाधिक विचारात घेतला जाईल. त्यामुळे गोलंदाजी क्रमवारीतही काही बदल होऊ शकतात.
शमीच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विकेट वेगवान गोलंदाजांना अनुकूल राहिल्यास अर्शदीप सिंगला खूप फायदा होऊ शकतो. दुसरीकडे दुखापतग्रस्त युजवेंद्र चहलच्या जागी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला दुसऱ्या वनडेत मैदानात उतरवण्यात आले. चहल तंदुरुस्त झाल्यास कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताचे संभाव्य Playing -11: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.