Asia Cup 2023 Final: फायलनपूर्वीच श्रीलंकेची डोकेदुखी वाढणार, तर संघातील बदल भारताच्या पथ्यावर पडणार

Maheesh Theekshana ruled out of Asia Cup 2023 Final
Maheesh Theekshana ruled out of Asia Cup 2023 Final
Updated on

Ind vs Sl Asia Cup 2023 Final : आशिया कप 2023 चा अंतिम सामना 17 सप्टेंबरला श्रीलंका आणि भारत यांच्यात कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली.

मात्र फायनलपूर्वी श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. लंकेचा फिरकी गोलंदाज महिष तिक्षिना आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. ही संघासाठी मोठी समस्या आहे.(Maheesh Theekshana ruled out of Asia Cup 2023 Final)

Maheesh Theekshana ruled out of Asia Cup 2023 Final
ODI World Cup : वर्ल्डकपच्या 20 दिवस आधी संघाला मोठा धक्का! सलामीवीरला झाली गंभीर दुखापत, टूर्नामेंटमधून जाणार बाहेर?

आशिया कपमध्ये गुरुवारी सुपर 4 फेरीचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. ज्या सामन्यात महिष तिक्षिना जखमी झाला. अंतिम सामन्यात तो खेळणार नाही. महिश तिक्षिनाने बाहेर जाणे हा श्रीलंकेसाठी मोठा धक्का आहे, कारण वानिंदू हसरंगाच्या अनुपस्थितीत तो संघाचा महत्त्वाचा फिरकीपटू होता.

Maheesh Theekshana ruled out of Asia Cup 2023 Final
Ind vs SL Asia Cup Final: श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 'या' 2 खेळाडूंवर टांगती तलवार, एकालाच मिळणार संधी

23 वर्षीय महिष तिक्षानाने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 2 कसोटी सामन्यात 5 बळी, 27 एकदिवसीय सामन्यात 44 बळी आणि 38 टी20 सामन्यात 34 बळी घेतले आहेत. त्याची दुखापत फारशी गंभीर नाही आणि वर्ल्ड कपपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल हे आजून तरी सांगता येत नाही.

इंडियन प्रीमियर लीगमुळे त्याला ओळख मिळाली आहे. तिक्षाना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळते आणि संघाच्या नियमित आणि कर्णधाराच्या विश्वासू खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आयपीएलच्या 22 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.