मोह आवर! गावसकरांचा रोहित शर्माला मोलाचा सल्ला

Sunil Gavaskar And Rohit Sharma
Sunil Gavaskar And Rohit Sharma Sakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भात्यातून निघणारा पुल शॉट पाहण्याजोगा असतो. त्याला स्वत:ला ही हा फटका मारायला खूप आवडते. अनेक सामन्यात त्याने या फटक्यावरच धावांची बरसात केल्याचे पाहायला मिळाले. पण श्रीलंका दौऱ्यात पुल शॉटवर रोहित फसताना दिसतोय. ज्या फटक्यावर तो सहा धावा घेतो तोच फटका मारण्याच्या नादात रोहित विकेट गमावत आहे. यासंदर्भात लिटल मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याला खास सल्ला दिला.

गोलंदाजांना मिळते आयती संधी

सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना रोहित शर्माच्या फलंदाजी शैलीवर भाष्य केले. जो गोलंदाज मध्यमगती गोलंदाजी करतो त्याला रोहितनं पुल शॉट्सवर चौकार षटकार मारल्याचा काही फरक पडणार नाही. खरंतर ती त्या गोलंदाजासाठी रोहितला बाद करण्याची एक संधी असते. रोहित पुल शॉट्स खेळताना हवेत चेंडू मारतो. त्यामुळे त्याने या शॉटमध्ये सुधारणा करायला हवी. स्वत:वर नियंत्रण ठेवून रोहितने हा फटका खळणं थांबवावे, असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे.

Sunil Gavaskar And Rohit Sharma
IND vs SL : शंभर टक्के! दोन वर्षांनी क्रिकेट स्टेडियम गजबजणार

पुल शॉट रोहित गोत्यात येतोय

जर पुल शॉट फायद्याचा वाटत असेल तर त्यांना निश्चित तो खेळावा. पण सध्याच्या घडीला पुल शॉट त्याच्यासाठी धोक्याचा ठरतो. 80 धावा झाल्या की मग त्याने आपल्या भात्यातला फटका मारायला हरकत नाही. पण तोपर्यंत त्याने आपला हा शॉट म्यान करावा, असे गावसकर म्हणाले आहेत.

Sunil Gavaskar And Rohit Sharma
IPL 2020 : यंदा रेकॉर्ड ब्रेक कमाई; BCCI मालामाल

मोहाली कसोटीत रोहित शर्मानं 28 चेडूंत 29 धावा केल्या होत्या. लाहिरू कुमाराने सापळा रचून त्याला बाद केले होते. त्याच्या बॉडी लाइन शॉर्ट लेंथ चेंडूवर रोहितने पुल शॉट मारला. पण तो लकमलच्या हाती झेल गेला होता. बंगळुरुच्या सामन्यात रोहित गावसकरांचा सल्ला ऐकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.