Hardik Pandya Arshdeep Singh No Ball Controversy : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंच्या जबदस्त कामगिरीपेक्षा अर्शदीप सिंगने टाकलेल्या नो बॉलची चर्चा अधिक झाली. अर्शदीपने दोन षटकात 7 नो बॉल टाकले होते. भारताच्या पराभवाचे हे एक कारण ठरले.
कर्णधार हार्दिक पांड्याने देखील सामन्यानंतर अर्शदीपला टार्गेट करत त्याच्यावर बोचरी टिप्पणी केली होती. अनेक जणांना कर्णधाराने आपल्याच संघातील एका युवा खेळाडूबद्दल जाहीररित्या असे बोलणे रूचले नाही. अनेकांनी हार्दिकला त्याच्या नो बॉलची आठवण करून दिली.
पत्रकार मनिष पांडेंनी भारताचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला त्याच्याच नो बॉलची आठवण करून देत त्याचेच दात घशात घातले. मनिष पांडेंनी ट्विट केले की, 'हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने कॅप्टन्सी करत आहे त्याचा मी फॅन आहे. मात्र स्वतःचा इतिहास कायम लक्षात ठेवावा. त्यांनी देखील नो बॉल टाकला होता आणि त्याचा तोटा आपल्याला वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये झाला होता.'
मनिष पांडे यांनी हार्दिकला 2016 च्या टी 20 वर्ल्डकपमधील भारत विरूद्ध वेस्ट इंडीज सेमी फायनलची आठवण करून दिली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 192 धावा केल्या होत्या. मात्र हे टार्गेट वेस्ट इंडीजने 20 व्या षटकात पार केले होते.
भारताकडून हार्दिक पांड्या सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला होता. त्याने आपल्या 4 षटकात 43 धावा दिल्या होत्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने मोक्याच्या वेळी एक नो बॉल देखील टाकला होता. धावांचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडीजने 19.4 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 196 धावांचे टार्गेट पार केले होते. (Sports Latest News)
भारत आणि श्रीलंकेच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 20 षटकात 206 धावा ठोकल्या होत्या. कर्णधार दशुन शानकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावा ठोकत मोठे योगदान दिले. त्यानंतर भारताने 5 बाद 56 धावा अशा खराब सुरूवातीनंतरही सामन्यात जोरदार पुनरागमन करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला.
अक्षर पटेलने 65 तर सूर्यकुमार यादवने 51 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र भारताला 190 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेने सामना 16 धावांनी जिंकत मालिका 1 - 1 अशी बरोबरीत आणली.
हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.