IND vs SL: कासवछाप गिल! त्रिपाठी-सूर्या कानामागून आले अन् तिखट झाले

मागून पुढे गेले गिल गोगलगाय सारखा तिथेच राहिला... नंतर उडाल्या दांड्या
 ind vd sl t20 Shubman Gill
ind vd sl t20 Shubman Gill sakal
Updated on

Ind vd Sl t20 Shubman Gill : शनिवारी राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकात 5 विकेट गमावत 228 धावा केल्या. सूर्यकुमारने 51 चेंडूत 112 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने सात चौकार आणि नऊ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 219.61 होता. सूर्याशिवाय शुभमन गिलने 36 चेंडूत 46 धावांची खेळी खेळली.

 ind vd sl t20 Shubman Gill
Suryakumar Yadav: 666666666... चेंडू 16 अन् धावा 82 सूर्या म्हणजे विषयाचं संपला!

पहिल्याच षटकात विकेट पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या राहुल त्रिपाठीने अवघ्या 16 चेंडूत 35 धावांची अंधूक खेळी केली. राहुलने या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. मात्र शुभमन गिल कासवासारखा खेळत राहिला. राहुल त्रिपाठीने बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव बॅटिंग करायला आला.

राजकोटमध्ये डावाच्या सहाव्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या सूर्याने जास्त वेळ न घेता तिसरा चेंडू सीमापार घेऊन आपला इरादा व्यक्त केला. हे पाहून सूर्याने आपले अर्धशतक अवघ्या 26 चेंडूत पूर्ण केले. त्यावेळेस पण शुभमन गिल सावकाश खेळत राहिला. त्याला 15 व्या षटकात वानिंदू हसरंगाने क्लीन बोल्ड केले. बाद होण्यापूर्वी त्याने सूर्यकुमारसोबत तिसऱ्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली.

 ind vd sl t20 Shubman Gill
Suryakumar Yadav: सूर्याने श्रीलंकेची केली धुलाई! अन् ठोकले तिसऱ्यांदा शतक

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत शुभमन गिलला संधी दिली पण तो फलंदाजीत फार काही करू शकला नाही. ओपनिंग करताना त्याने मालिकेतील दोन सामन्यात केवळ 12 धावा केल्या. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यात गिलने केवळ 7 धावा केल्या होत्या. या सामन्यातही तो विशेष काही करू शकला नाही आणि 3 चेंडूत अवघ्या 5 धावा केल्या. राजकोट मध्ये त्याने 36 चेंडूत 46 धावा केल्या मात्र सावकाश रित्या केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()