VIDEO : धुलाईचा बदला; जाडेजाला मिळाली व्यंकटेशची साथ!

IND vs SL
IND vs SLSakal News
Updated on

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना धर्मशालाच्या मैदानात रंगला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करत रोहितचा निर्णय व्यर्थ ठरवला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी रविंद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

श्रीलंकेच्या डावातील नवव्या षटकात जाडेजा बॉलिंगसाठी आला. पहिल्याच चेंडूवर दनुष्का गुणातिलकनं त्याला उत्तुग षटकार लगावला. त्यानंतर चौकार आणि षटकार अशा तोऱ्यात त्याने जाडेजाचे स्वागत केले. मात्र जाडेजाने याच षटकात त्याला आपल्या जाळ्यात अडकवत चौका-षटकाराचा बदला घेतला. चौथ्या चेंडुवर पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादात गुणातिलक झेलबाद झाला. सीमारेषेवर व्यंकटेश अय्यरने त्याचा उत्तम झेल टिपला. दनुष्कानं 29 चेंडूत 38 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार खेचले.

IND vs SL
पुतिन यांना घरचा आहेर; रशियन टेनिसपटूने कॅमेऱ्यावर लिहिले...

धर्मशालाच्या मैदानात श्रीलंकेच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या आठ षटकातच धावफलकावर 60 पेक्षा अधिक धावा लावल्या होत्या. रविंद्र जाडेजाने 8.4 षटकात ही जोडी फोडली. 67 धावांवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. भारतीय संघाला मिळालेल्या या यशात जाडेजा इतकाच महत्त्वाचा वाटा हा व्यंकटेश अय्यरनं (Venkate shIyer) उचलला. त्याने घेतलेला झेल अप्रतिम असाच होता. या झेलच खूपच कौतुक होत आहे.

IND vs SL
VIDEO: नदालने रशियन मेदवेदेवचा केला पराभव; चाहत्यांनी स्टेडियम सोडले दणाणून

रविंद्र जाडेजा दोन महिन्यानंतर टीम इंडियात कमबॅक करत आहे. दक्षिण आफ्रिका दौरा आणि वेस्ट इंडिज विरुद्ध तो मैदानात दिसला नव्हता. दुखापतीमुळे त्याला या दोन्ही मालिकेला मुकावे लागले होते. दुखापतीतून सावरुन त्याने पहिल्या टी-20 सामन्यात दोन विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही त्याला विकेट मिळाली. 4 षटकात 37 धावा करुन त्याने एकमेव विकेट मिळवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.