भारत आणि श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटी सामन्यात 50 टक्के क्षमतेनं स्टेडियम भरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहाली क्रिकेट असोसिएशने हा कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहली मोहालीच्या मैदानावर शंभरावा सामना खेळणार आहे. स्टार क्रिकेटर्ससाठी ऐतिहासिक सामन्यात प्रेक्षकांना एन्ट्री नाही, यावरुन अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर पंजाब क्रिकेट असोसिएशनने स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी परवानगी दिली आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमीच आहे.
कसोटी मालिकेपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची ट-20 मालिका रंगली होती. या मालिकेतील पहिला सामना लखनऊ तर उर्वरित दोन सामने धरमशालाच्या स्टेडियमवर खेळवण्यात आले होते. या सामन्यांवेळी मर्यादित क्षमतेन प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. याशिवाय बंगळुरुमध्ये खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यासाठीही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सोडण्यात येणार होते.
पण पंजाब क्रिकेट असोसिएशनने एक वेगळीच भूमिका घेतली. मोहालीच्या मैदानातील कसोटी सामना प्रेक्षकांशिवाय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा सामना विराट कोहलीसाठी खास असाच आहे. तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शंभरावा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. मैदानात प्रेक्षक असताना विराटमध्ये एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळते. तो या क्षणाला मुकणार असे वाटत होते. मात्र आता पंजाब क्रिकेट असोसिएशनने आपला निर्णय बदलून ठराविक क्षमतेन प्रक्षकांना परवानगी दिली आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या शंभराव्या कसोटीत कोणत्याही प्रकारचे कठोर निर्बंध नसल्याचे म्हटले होते. बीसीसीआयने याप्रकरणात राज्य क्रिकेट असोसिएशनसोबत चर्चा केली. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार, मोहाली कसोटीसंदर्भात निर्णय घ्यावे, असे स्पष्ट केल्याचे म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.