IND vs SL world cup 2023 : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका आमने सामने आले आहेत. या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरूवातील कुठे तरी हा निर्णय योग्य ठरला दिसत आहे.
सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने चौकार मारला पण पुढच्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. अशाप्रकारे भारतीय कर्णधार रोहित शर्माची खेळी अवघ्या दोन चेंडूत संपुष्टात आली.
तरी पण रोहितने या वर्ल्ड कपमध्ये चौकार मारून विशेष कामगिरी केली आहे. स्पर्धेत 400 धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला, पण पुढच्या चेंडूवर त्याचा खेळ खेल्लास झाला. मधुशंकाने रोहितला बाद करण्याची ही दुसरी वेळ आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यासाठी भारतीय कर्णधाराची पत्नी रितिकाही स्टेडियममध्ये होती. मात्र रोहित क्लीन बोल्ड झाला यावर तिचा विश्वास बसेना. यादरम्यान तिचा चेहरा पडला.
असं असलं तरी, वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माचा एकदिवसीय सामन्यात वाईट रेकॉर्ड आहे. हा त्याचा येथील चौथा एकदिवसीय सामना होता आणि आतापर्यंत तो केवळ 50 धावा करू शकला आहे, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 20 धावा आहे. डाव्या हाताच्या गोलंदाजांनी रोहितला नेहमीच त्रास दिला आहे.
रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये 34 वेळा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा बळी ठरला आहे. मात्र, त्याने 1617 धावाही केल्या आहेत. यामध्ये त्याने 44 षटकार आणि 179 चौकार मारले आणि डावखुरा वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेटही 88 होता.
या वर्ल्ड कपमध्ये रोहितने मिचेल स्टार्क, शाहीन शाह आफ्रिदी आणि ट्रेंट बोल्टचे आव्हान पार केले होते. फक्त, दिलशान मधुशंकाबद्दल भीती होती कारण त्याने आधीच रोहितला बाद केले आणि पुन्हा त्याने वानखेडेवर भारतीय कर्णधाराची शिकार केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.