Ind vs Sl World Cup 2023 : यंदा भारतात खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीची जादू पाहिला मिळत आहे. या मेगा स्पर्धेत विराटची दोन शतके हुकली आहेत. प्रथम तो न्यूझीलंडविरुद्ध 95 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 12 धावांनी त्याचे शतक हूकले. हा तोच विराट आहे, ज्याला 80 धावांवर बाद करणे हे कोणत्याही गोलंदाजासाठी मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत विराट कोहली यावेळी शतक का पुर्ण करत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नांचे उत्तर इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू मॉन्टी पानेसर याने उलगडले आहे.
श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांविरुद्धच्या सामन्यांमध्ये विराट अप्रतिम फलंदाजी करताना दिसला. दोन्ही वेळा विराट सचिनच्या महान विक्रमाची बरोबरी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण दोन्ही वेळेस कोहली चुकला.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, त्याच्या नावावर 49 शतके आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत 48 शतके झळकावली आहेत. त्याचे हे शतक झाले असते तर आतापर्यंत हा विक्रम मोडला गेला असता. हाच मुद्दा मॉन्टी पानेसर यांनी बोलून दाखवला आहे. विराट कोहलीचे लक्ष विक्रमांवर असल्याचे त्याने स्पष्ट केले.
एका न्यूज चॅनलसोबत बोलताना मॉन्टी पानेसर म्हणाला की, 'विराट रेकॉर्डबद्दल विचार करत आहे. त्याचे लक्ष रेकॉर्डवर आहे. त्याने फक्त फलंदाजीचा विचार करायला हवा. या वर्ल्ड कपमध्ये सचिन पाजीचा विक्रम मोडायचा आहे असे समजू नका. सध्या विराट कोहलीचा काळ सुरू आहे. न्यूझीलंडविरुद्धही तो 95 धावा करून बाद झाला होता. त्यांनी माईलस्टोनचा नव्हे तर धावा करण्याचा विचार केला पाहिजे. त्याने संघाचा विचार करायला हवा.
विराट कोहली 5 नोव्हेंबरला 35 वर्षांचा होणार आहे. या दिवशी टीम इंडियाचा सामना या वर्ल्ड कपच्या अव्वल संघांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या दिवशी चाहत्यांना कोहलीकडून शतकाची अपेक्षा आहे. या सामन्यात कोगली शतक झळकावण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहायचे आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केवळ कोहलीचे शतक हुकले नाही तर शुभमन गिलही 92 धावांवर बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरही 82 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.