WI vs IND: पहिल्या वनडेसाठी भारताची Playing-11 निश्चित, कर्णधार रोहित 'या' खेळाडूंना देणार डच्चू?

Ind vs Wi 1st ODI Playing-11
Ind vs Wi 1st ODI Playing-11sakal
Updated on

Ind vs Wi 1st ODI Playing-11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवार 27 जुलै रोजी ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. वनडे मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंचा समावेश असणार आहे.

रोहित शर्मा वनडे मालिकेत टीम इंडियाचे कर्णधार असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 जवळपास निश्चित झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा काही खेळाडूंना बाहेर करू शकतो. जाणून घ्या कोणात्या प्लेइंग इलेव्हन सोबत रोहित मैदानात उतरणार आहे.

Ind vs Wi 1st ODI Playing-11
Minnu Mani Railway Junction: घरी जायला रस्ता नाही, स्टेशनला दिले तिचे नाव! भारतीय महिला क्रिकेटरची अजब कहाणी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल. हे दोन्ही फलंदाज पॉवर-प्लेमध्ये धावा करण्यात माहिर आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होऊ शकतो.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 76 शतके झळकावली आहेत. भारतीय संघ व्यवस्थापन सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संधी देऊ शकतो.

Ind vs Wi 1st ODI Playing-11
WI vs IND: ODI मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा! दोन दिग्गज खेळाडूचा पत्ता कट, यांना मिळाली संधी

इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिल्या जाऊ शकते. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी विकेटकीपिंग केले आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेतही इशान किशनला प्लेइंग 11 मध्ये यष्टीरक्षक म्हणून कायम ठेवेल. त्यामुळे यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा पत्ता कट होऊ शकतो.

उपकर्णधार हार्दिक पंड्या अष्टपैलू म्हणून सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. तर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाला संधी देईल. रवींद्र जडेजा टीम इंडियाला फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीत मजबूत करेल.

Ind vs Wi 1st ODI Playing-11
Asian Games Football : सहभागाबाबत भारतीय फुटबॉल महासंघ आशावादी; सुनील छेत्रीकडे नेतृत्व!

डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील सर्वात मोठे आव्हान ठरतील. कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहल यांना बाहेर करेल.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांना संधी देणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक यांचा बळी दिल्या जाऊ शकतो.

पहिल्या ODI सामन्यात ही असू शकते भारताची प्लेइंग 11 - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.

वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा पूर्ण संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र यादव, यजवेंद्र यादव, यजवेंद्र यादव, मलिक यादव, युजवेंद्र यादव, मलिक, उन्हे. मुकेश कुमार.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका

  • पहिली वनडे, 27 जुलै, संध्याकाळी 7.00 वाजता, बार्बाडोस

  • दुसरी वनडे, 29 जुलै, संध्याकाळी 7.00 वाजता, बार्बाडोस

  • तिसरी एकदिवसीय, 1 ऑगस्ट, संध्याकाळी 7.00 वाजता, त्रिनिदाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.