Ind vs Wi 1st Test: यशस्वी जैस्वालच्या शतकाने माजी उप-कर्णधारची जागा धोक्यात! टीम इंडियाचे दरवाजे बंद?

Ind vs Wi 1st Test
Ind vs Wi 1st Test
Updated on

Ind vs Wi 1st Test : भारताचां स्फोटक सलामीवीर यशस्वी जैस्वालने टीम इंडियाच्या धडाकेबाज आणि माजी उप-कर्णधार क्रिकेटपटूची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आणली आहे. यशस्वी जैस्वालच्या शतकामुळे त्या खेळाडूच्या पुनरागमनाचे सर्व दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्ध डोमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 350 चेंडूत 143 धावा केल्यानंतर यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहे. यशस्वी जैस्वालने आतापर्यंत 14 चौकार मारले आहेत.

Ind vs Wi 1st Test
Wi vs Ind 1st Test : भयंकर उकाड्यात रोहित-यशस्वीचा धडाका अन् कॅरेबियन गोलंदाज मैदान सोडून गेला पळून

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर आणि माजी उप कर्णधार केएल राहुलच्या पुनरागमनाचे जैस्वालने जवळपास सर्व दरवाजे बंद केले आहेत. शुभमन गिल भारतीय कसोटी संघात क्रमांक-3 वर खेळणार आहे. अशा परिस्थितीत आता केएल राहुलला पुन्हा एकदा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे कठीण दिसत आहे. झंझावाती फलंदाज यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्धचा ट्रेलर दाखवला, त्यानंतर तो टीम इंडियाचा कायमस्वरूपी सलामीवीर बनेल असे मानले जात आहे.

Ind vs Wi 1st Test
Wi vs Ind: पहिल्याच सामन्यात यशस्वी-रोहित जोडीनं केलेत मोठे कारनामे! जाणून घ्या सगळे विक्रम एका क्लिकवर

भारतीय संघ व्यवस्थापन भारतीय कसोटी संघासाठी आक्रमक सलामीवीर शोधत होते, ज्याचा शोध आता पूर्ण झाला आहे. यशस्वी जैस्वाल हा एकमेव फलंदाज आहे जो भारतीय कसोटी संघात रोहित शर्मासोबत सलामी देत राहील. आता केएलच्या शेवटच्या कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या कामगिरीनंतर त्याला पुन्हा कसोटी संघात स्थान मिळणे कठीण आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माने सलामीवीर केएल राहुलला संधी दिली, पण तो फ्लॉप ठरला. यानंतर केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले.

भारतीय कसोटी संघाला ज्या स्फोटक सलामीवीराची टीम इंडियाला गरज आहे, तीच यशस्वी जैस्वाल आहे. यशस्वी जैस्वाल टीम इंडियाचे सर्वात मोठे शस्त्र ठरू शकते. यशस्वी जैस्वालची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे. डाव्या हाताचे फलंदाज हे कोणत्याही संघासाठी एक्स फॅक्टर ठरतात. यशस्वी जैस्वालकडूनही टीम इंडियाला मजबूत संतुलन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.