IND vs WI : मैदानात पाय ठेवताच पोलार्डची सेंच्युरी!

Kieron Pollard 100th T20I
Kieron Pollard 100th T20I Sakal
Updated on

IND vs WI 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगला आहे. हा सामना वेस्ट इंडीजसाठी खास असाच आहे. कॅरेबियन कर्णधार कायरेन पोलार्डनं नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच सेंच्युरी करत खास विक्रम आपल्या नावे केला. पोलार्ड 100 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. शंभराव्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यापूर्वी सहकाऱ्यांनी त्याला शंभर नंबरची जर्सी आणि कॅप दिल्याचे पाहायला मिळाले.

Kieron Pollard 100th T20I
Ranji Trophy : श्रीसंतला 9 वर्षानंतर यश; पण एवढं पुरेस नाही!

कायरेन पोलार्ड (Kieron Pollard)हा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा पहिला कॅरेबियन क्रिकेटर आहे. जागतिक क्रिकेटर्सचा विचार केल्यास तो 9 वा खेळाडू आहे जो शंभरावा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळत आहे. पोलार्ड आधी पाकिस्तानच्या शोएब मलिक (Shoaib Malik) (124), भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (121), पाकिस्तानचा मोहम्मद हाफिज (119), इंग्लंडचा इयॉन मॉर्गन (115), बांगलादेशचा महमूदुल्लाह (113), न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल(112), आयरलंडचा केविन ओ' ब्रायन (110) आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर(102) यांनी शंभरी पार केली आहे.

Kieron Pollard 100th T20I
सचिन भारी की विराट? उत्तर खुद्द देवानंच दिलं

100 षटकारांच्याही जवळ

आतापर्यंत खेळलेल्या 99 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पोलार्डनं 81 डावात 25.29 च्या सरीसरीसह 135.62 च्या स्ट्राइक रेटनं 1561 धावा केल्या आहेत. यात 99 षटकारांचा समावेश आहे. शंभराव्या सामन्यात शंभर षटकार पूर्ण करण्याची त्याच्याकडे संधी आहे. जर त्याने धावांचा पाठलाग करताना षटकार खेचला तर 100 षटकार पूर्ण करणारा तो आठवा खेळाडू ठरेल. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावे आहे. त्याने आतापर्यंत 165 षटकार खेचले आहेत. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहेत. हिटमॅन रोहितच्या खात्यात 153* षटकारांची नोंद आहे. क्रिस गेल (124), इयॉन मोर्गन(120), एरोन फिंच (113), एविन लुईस(110) आणि सातवें क्वॉलिन मुन्रो (107) नं ही शंभर षटकार मारण्याचा पल्ला पार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.