IND vs WI: दुसऱ्या कसोटीत कर्णधार रोहितचा मोठा निर्णय, 'या' खेळाडूचा Playing-11 मधून पत्ता कट?

IND vs WI 2nd Test
IND vs WI 2nd TestSAKAL
Updated on

India vs West Indies 2nd Test 2023 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवूनही कर्णधार रोहित शर्मा त्रिनिदाद येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करू शकतो.

IND vs WI 2nd Test
Manipur Violence : 'कृपया माझे राज्य...', मणिपूर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीराबाई चानूची मोदी शाह यांना विनंती

कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकतो. त्याच्या जागी लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलला संधी दिल्या जाऊ शकते. त्रिनिदादची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे.

अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे तीन फिरकी गोलंदाज एकत्र खेळू शकतात. त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना वेगवान गोलंदाज म्हणून टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. जयदेव उनाडकटला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावं लागले.

IND vs WI 2nd Test
Wi vs Ind Test : वर्ल्डकप 2023 नंतर राहुल द्रविड सोडणार प्रशिक्षकपद? 'या' कारणाने घेणार मोठा निर्णय...

कर्णधारने जयदेव उनाडकटला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती, मात्र हा खेळाडू फ्लॉप ठरला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्य ला एकही विकेट मिळालेली नाही.

2010 ते 2023 पर्यंत या खेळाडूने भारतासाठी फक्त तीन कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यातही या वेगवान गोलंदाजाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. जयदेव उनाडकटने भारताकडून आतापर्यंत केवळ 3 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याला केवळ 3 विकेट्स मिळाल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा 13 वर्षात 3 कसोटी सामने खेळणाऱ्या या वेगवान गोलंदाजाची कारकीर्द संपुष्टात आणू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.