Ind vs Wi : 'आमचे सध्याचे कोच राहुल भाई...' वेस्ट इंडिज दौऱ्यापुर्वी अश्विनने केलं मोठे वक्तव्य

ind vs wi ravichandran ashwin
ind vs wi ravichandran ashwin
Updated on

Ind vs Wi Series : भारतीय क्रिकेट संघ दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरला आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे जिथे त्यांना दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची तयारी कशी सुरू आहे, हे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने सांगितले.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. यासह टीम इंडिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पुढील वर्तुळाची सुरुवात करेल. यादरम्यान वेस्ट इंडिज दौऱ्यापुर्वी अश्विनने कोच राहुल द्रविडबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

ind vs wi ravichandran ashwin
Ind vs Wi : आगरकरने CSK च्या खेळाडूंना डावललं! देशपांडेच्या जागी आवेश खान, ऋतुराजला देखील दाखवला कट्टा

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांना तयारीबद्दल तपशीलवार माहिती दिली. तो म्हणाला, 'आम्ही वेस्ट इंडिजला आधीच पोहोचलो आहोत. आमच्याकडे सराव करण्यासाठी आणि जेट लॅगवर मात करण्यासाठी 10 दिवस आहेत. आमचे सध्याचे प्रशिक्षक राहुल भाई नेहमी सरावावर खूप लक्ष देतात. आपण आपली तयारी केली तर बाकी आपोआप होईल. त्यामुळे आपले लक्ष सरावावर ठेवा.

ind vs wi ravichandran ashwin
PCB Chairman : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! नजम सेठीच्या जागी नव्या अध्यक्षांची घोषणा

अश्विन वेस्ट इंडिजमध्ये येण्यापूर्वी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. मात्र या मालिकेसाठी त्याला मध्यंतरी लीग सोडावी लागली. अश्विनला वाटले की आपण सहा-सात सामने खेळू पण त्याला फक्त चार सामने खेळून लीग सोडावी लागली.

अश्विनने व्हिडिओमध्ये असेही नमूद केले आहे की पहिला कसोटी सामना डॉमिनिकामध्ये खेळला जाणार आहे, परंतु संपूर्ण संघ बार्बाडोसमध्ये सराव करत आहे कारण तेथे संघाचा शिबिर सुरू आहे. येथे दोन दिवसीय सराव सामना खेळल्यानंतर संघ पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी जाणार आहे.

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सदस्यांनी दिग्गज क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांची भेट घेतली. बीसीसीआयने बार्बाडोसमधील दिग्गजांसह वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधारासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. टीम इंडियाने या खेळातील महान खेळाडूंपैकी एक सर गारफिल्ड सोबर्स यांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.